
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शासकीय रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग फक्त सकाळी साडे आठ ते साडे बारा यावेळेत सुरू ठेवले जात आहे
कोल्हापूर - राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणारी शासकीय रूग्णालये दिवसभरात दोन वेळेत सुरू करण्याचे आदेश आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिले आहेत. तसे पत्र सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शासकीय रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग फक्त सकाळी साडे आठ ते साडे बारा यावेळेत सुरू ठेवले जात आहे. असे आढळून आले आहेत. त्यामुळे अनेक रूग्णांना उपचार सेवेपासून दूर रहावे लागते अशा स्थितीत प्रत्येक व्यक्तीला उपचार सेवेचा लाभ घेता यावा यासाठी बाह्यरूग्ण विभाग सकाळी साडे आठ ते साडे बारा व सायंकाळी 4 ते सहा यावेळेत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशातील अन्य सूचना
सार्वजनिक सुट्टी असलेल्या दिवशीही बाह्यरूग्ण विभाग सुरू राहील.
रूग्णालय मध्ये दुपारी 1 ते सायंकाळी 4 यावेळेत विशेष बाह्यरूग्ण विभागाला तसेच योगा वर्ग चालविण्यात यावेत.
शनिवारी दुपारी ओपिडी बंद ठेवण्यात येईल.
रूग्ण नोंदणी दुपारी साडे बारा व सायंकाळी 6 वाजता बंद होईल. मात्र त्यापूर्वी ज्यांना केस पेपर दिला आहे त्यासर्वांची तपासणी होणार आहे.
ज्या प्राथमीक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी आहेत तेथील दुपारची ओपीडी बंद राहील. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फिरती करावी.
हे पण वाचा - कोगनोळीजवळ शिवसैनिकांना धक्काबुक्की ; कर्नाटक पोलिसांची अरेरावी
संपादन - धनाजी सुर्वे