कोल्हापुरातील संवेदनशील 80 गावांत कडेकोट बंदोबस्त 

राजेश मोरे
Wednesday, 30 December 2020

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान, तर मतमोजणी 18 ला होणार आहे

कोल्हापूर - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील संवेदनशी अशा 80 गावांत तीन टप्प्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गुंडावर प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रियाही वेगाने सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान, तर मतमोजणी 18 ला होणार आहे. गावागावांत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. ग्रावस्तरावर प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत कमालीची ईर्षा असते. यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, ही निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पडावी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी बलकवडे यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गावागावांत स्थानिक पोलिस ठाण्याच्या माध्यमातून ग्रामसभा घेऊन त्यांना कायद्याचे पालन करण्याबाबत सूचना केल्या आहेत. याच दरम्यान पोलिसपाटील यांचीही बैठक घेऊन त्यांना त्यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन केले आहे. ज्या गावात निवडणुकीच्या काळात यापूर्वी मारामाऱ्याचे प्रकार घडले आहेत, ज्या गावात जास्त चुरस आहे अशा 80 गांवावर पोलिसांचा वॉच राहणार आहे. येथे इतर ठिकाणाहून अधिकचा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच गावागावांत उपद्रवी ठरणाऱ्या गुंडाची यादी तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मकसह स्थानबद्धची प्रक्रियाही पोलिसांनी सुरू केली आहे. 

तालुकानिहाय मतदान केंद्राची संख्या 
तालुका*ग्रामपंचायती*इमारती*मतदान केंद्रे* संवेदनशील गावे 
करवीर*54*73*220*15 
कागल*53*95*246*08 
हातकणंगले*21*50*173*09 
गडहिंग्लज*50*56*192*21 
शाहूवाडी*41*41*124*16 
भुदरगड*45*74*136*10 
आजरा*26*32*78*--- 
चंदगड*41*58*132*05 
राधानगरी*19*32*59*06 
गगनबावडा*08*14*24*03 
शिरोळ*33*89*245*04 
पन्हाळा*42*64*171*14 
एकूण*433*678*1800*111 
 
पोलिसांचा वॉच राहणारी प्रमुख गावे 
*करवीर तालुका : नंदगाव, गिरगाव, पाटेकरवाडी, कोपार्डे, हणमंतवाडी, खुपिरे, सडोली खासला, आरे, निगवे दुमाला, कोगे, कुडित्रे, खाटांगळे, तेरसवाडी, महे व शिये. 
*कागल तालुका : बानगे, गोरंबे, सिद्धनेर्ली, म्हाकवे, बेलवळे खुर्द, बेलवळे बुद्रुक, साके, मौजे सांगाव यासाह इतर तालुक्‍यातील संवदेनशील अशा एकूण 111 गावापैकी 80 गावांत कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. 

हे पण वाचा एका मताने काय फरक पडतो? मग वाचा ही बातमी

 
80 गावांत तीन टप्प्यात बंदोबस्त... 
जिल्ह्यातील संवेदनशील 80 गावांत तीन टप्प्यात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात मतदान केंद्रावर, दुसऱ्या टप्प्यात संबंधित गावात आणि तिसऱ्या टप्प्यातील भरारी पथकाचा वॉच या गावावर असणार आहे. यात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. 
 
असा असेल बंदोबस्त... 
*पोलिस कर्मचारी : 2000 
*अधिकारी : 54 
*होमगार्ड : 1000 
*राज्य राखीव दलाच्या तुकड्या : 2 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election 2020 kolhapur police