उमेदवारी अर्जांचा ढीग ; आता माघार घेणार कोण? 

gram panchayat election 2020 maharashtra
gram panchayat election 2020 maharashtra
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची झुंबड उसळली आहे. नाही-नाही म्हणतं एका-एका गावात 13 ते 15 जागांसाठी 100 ते 150 इच्छुकांनी अर्ज भरल्याने गावकारभाऱ्यांची डोके दुखी वाढली आहे. मला कोण विचारत नाही, आता माघार घे म्हणून येवू द्यात घरी म्हणून अनेकांनी फॉर्म भरला आहे. तर, अनेकांनी तू कसा निवडूण येत नाहीस बघूच म्हणणाऱ्यांचे ऐकूण अर्ज भरला आहे. जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 4027 सदस्यांसाठी 15 हजार 402 जणांनी 15 हजार 829 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे गावागावात आता माघार घेणार कोण?याचीची चर्चा सुरु झाली आहे. 

आता माघार नाही म्हणतं 21 वर्ष पूर्ण झालेल्यांपासून अगदी 60च्यावर असणाऱ्या ज्येष्ठांनीही आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत आपले गाव बिनविरोध होईल, असा अंदाज बांधणाऱ्याचे सायंकाळी उमेदवारी अर्जाचा आकडा बघून डोक चक्रावून जाण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात एका गावातील एका प्रभागात 3 किंवा 4 सदस्य निवडूण द्यायचे असतील तर त्या ठिकाणी 25 ते 30 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कागल, करवीर, गडहिंग्लज तालुक्‍यातील गावांचा यामध्ये पुढाकार आहे. 

अनेकांना आपले गावातील ग्रामपचांयत निवडणूक बिनविरोध व्हावी असे वाटते. लोकांमधील विरोध, संघर्ष कमी व्हावा. खेळीमेळीत निवडणूक व्हायात अशी भावना आहे. त्यामुळे जे उमेदवार गावच्या विकासासाठी प्रयत्न करतील, त्यांनाच संधी दिली पाहिजे, असे म्हणून अनेकजण चांगल्या उमेदवारांना पाठिंबा देत आहे. पण केवळ एक-मेकांना उभं-आडवं करण्याच्या राजकारणात गावगावातील उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आपले गाव बिनविरोध होईल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणूका असणाऱ्या ग्रामपंचायती, एकूण सदस्य संख्या, मतदार संख्या  

ग्रामपंचायती : 433 
प्रभाग संख्या : 1 हजार 492 
सदस्य संख्या : 4 हजार 27 
मतदान केंद्र : 1 हजार 781 
पुरुष मतदार : 4 लाख 78 हजार 494 
हिला मतदार : 4 लाख 51 हजार 375 
इरत मतदार : 08 
एकूण मतदार : 9 लाख 29 हजार 877 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com