प्रचाराच्या तोफा थंडावल्या; पडद्यामागच्या घडामोडींना वेग 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. पैकी ४७ बिनविरोध झाल्या आहेत.

कोल्हापूर : भावांनो आज प्रचार संपला..लढाई अजून बाकी आहे, असं म्हणत ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांनी आज जाहीर प्रचाराची सांगता केली. गल्लोगल्ली जाऊन मतदारांची भेट घेतली. कोणी व्यवसाय बंद ठेवला, तर कोणी कामावर दांडी मारून प्रचारात सक्रिय झाले होते. मतदान शुक्रवारी (ता. १५) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच दरम्यान होईल. मतमोजणी सोमवारी (ता. १८) आहे. 

जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. पैकी ४७ बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी प्रचाराचा धुरळा उडाला होता. संस्था, गटतट, समूहाच्या पातळीवर निवडणूक लढवली जात आहे. छुप्या प्रचाराने वेग घेतला आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी सर्वच अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. कागल, करवीर, राधानगरी, आजरा तालुक्‍यांत सर्वाधिक ईर्षा दिसून येत आहे.

प्रशासनाकडूनही ईव्हीएम मशिन तपासणी व पाठवण्याचे नियोजन झाले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज पुन्हा ईव्हीएम मशिन तपासणी व ज्या-त्या मतदान केंद्रावर मशिन पाठविण्याबाबत आढावा घेतला. 
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election 2021 kolhapur