
ग्रामपंचायत गडमुडशिंगी साठी सकाळपासून मोठ्या रांगा
उजळाईवाडी (कोल्हापूर) : ग्रामपंचायत गडमुडशिंगी पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रचंड चुरस असून या ठिकाणी काँग्रेस आघाडी, भाजप आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व आरपीआय अशी तिरंगी लढत होत आहे. दरम्यान सकाळी सात वाजता सहा प्रभागांसाठी मतदानास प्रारंभ झाला. सकाळ पासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत होता. मतदानासाठी मोठ्या रांगा लागलेल्या होत्या.
विद्यमान सत्ताधारी भाजपप्रणीत कै. शिवाजीराव कृष्णात पाटील शेतकरी विकास आघाडी चे नेतृत्व तानाजी कृष्णात पाटील हे करीत असून काँग्रेस प्रणित सतेज पाटील आघाडीचे नेतृत्व डॉ. अशोकराव पाटील हे करीत आहेत. तर राष्ट्रवादीचे आप्पासाहेब धनवडे आरटीआय चे नंदकुमार गोंधळी व शिवसेनेचे पोपट दांगट यांनी बहुजन विकास आघाडी द्वारे तिसर्या आघाडीचे आव्हान काँग्रेस व भाजप आघाडीच्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यां समोर ठेवले आहे.
हेही वाचा- ब्रेकिंग ; धारवाडजवळ झालेल्या टेम्पो - टिप्परच्या भीषण अपघातात अकराजण ठार
करवीर पूर्वभागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून व अनेक दिग्गजांचे भविष्य या ठिकाणी पणाला लागले असल्यामुळे गडमुडशिंगी ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण जिल्ह्यामध्ये लक्षवेधी ठरली आहे. प्रचाराच्या बाबतीतही अनेक अभिनव संकल्पना यावेळी मतदारांना पहायला मिळाल्या. घरोघरी मतदारांची संपर्क साधून कार्यकर्त्यांनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे. प्रचंड चुरस असल्यामुळे विजया बाबत कोणाचीही ठामपणे खात्री देता येत नाही .
संपादन- अर्चना बनगे