"कोल्हापूरमध्ये आता एका आठवड्यात होणार पाच हजारांवर स्वॅबची तपासणी "

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

 आरएनए एक्‍स्ट्रॅक्‍शन प्रयोगशाळेत कार्यान्वित

कोल्हापूर : आरएनए एक्‍स्ट्रॅक्‍शन हे मशीन सूक्ष्मजीव शास्त्र प्रयोगशाळेत बसवल्यामुळे आठवड्यात पाच हजारांवर स्वॅबची तपासणी होऊ शकणार आहे. ‘हायफ्लो नेझल ऑक्‍सिजन’चे वीस व तर तीस व्हेंटिलेटर खरेदी केले आहेत. यामुळे २५० ऑक्‍सिजन बेडची सोय जिल्ह्यात होत झाल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज सायंकाळी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच घरीच उपचार करता येणार असून त्यासाठीचे किट दिले जाणार आहे. मोबाइलवरूनही मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी फिजिशियन असोसिएशनशी संपर्क साधून ही व्यवस्था केल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
 

जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असली तरीही डिस्चार्ज होण्याचे प्रमाण मोठे आहे. सौम्य लक्षणे असणारे किंवा लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे. वडणगे ग्रामपंचायतीपासून याची सुरवात झाली आहे. आज अखेर ३५८ बाधित घरी उपचार घेत आहेत. प्रशासनामार्फेत त्यांना िकटमध्ये प्लस ऑक्‍सिमीटर, डिजिटल थर्मामिटर, मास्क, सॅनिटायझर देण्यात येत आहेत. नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरातील नागरी आरोग्य केंद्र व प्रभाग जोडण्यात येणार आहेत.

हेही  वाचा - सांगलीत आजपासून चारचाकीत चार, दुचाकीवर दोन प्रवाशांना परवानगी

सीपीआरमध्ये एकूण ३८० बेड आहेत. ५४ व्हेंटिलेटर आहेत. १५ एनआयव्ही हायफ्लो नेझल ऑक्‍सिजन वीस, आणि तीस व्हेंटिलेटर खरेदी केले आहेत. २५० ऑक्‍सिजन बेड जोडले जात आहेत. डीसीएचसी आणि डीसीएचला पाच एक्‍सरे मशीन दिले जात आहेत. रोज दोन हजार स्वॅबचे नमुने तपासणीसाठी येत असल्यामुळे अहवालासाठी वेळ लागत आहे. अतिरिक्त आरएनए एक्‍स्ट्रॅक्‍शन मशिन आल्यामुळे तपासणी आठवडाभरात पाच हजारपर्यंत जाणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

हेही  वाचा -कोरोनामुळे ब्रेक लागलेल्या चाळीसवर गृहप्रकल्पांना आता दसऱ्याचा मुहूर्त

प्रत्येक सेंटरमध्ये अँटिजेन टेस्ट
सीपीआरमध्ये अतिरिक्त नॉन कोविड विभागात ऑक्‍सिजन लाईनचे काम सुरू झाले आहे. अँटीजेन रॅपिड टेस्ट मध्ये रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला तरीही आरटीपीसीआर मशिनवर तपासण्याचे शासनाचे निर्देश आहेत. जिल्ह्यासाठी एकूण साठ अँटिजेन टेस्ट कीट आले होते. एका किटमध्ये २५ चाचण्या होतात. चार हजार अतिरिक्त कीट ग्रामीण भागात दिले आहेत. प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे.

हेही  वाचा -कडेगाव तालुक्‍यात पावसाळ्यात पाणी टंचाई

दृष्टिक्षेपात
बायोमेडिकल वेस्टसाठी स्वतंत्र एजन्सी
सीपीआरमध्ये स्वतंत्र महिला अलगीकरण कक्ष
सीपीआरमध्ये १३ (केएल) ऑक्‍सिजन टॅंक 
जम्बो सिलिंडर व लिक्वीड ऑक्‍सिजन उपलब्ध  पालिकेच्यावतीने खासगी रुग्णालयांना दरफलक      लावण्याबाबत आदेश
बेड नियंत्रण कक्षात दिवसाला सरासरी ४४० कॉल
सहा दिवसांत २ हजार ६४६ फोन
३०२ व्यक्तींना बेडबाबत मार्गदर्शन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: guardian minister satej patil press conference in kolhapur covid test fast in kolhapurcity