तर कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणारी वाहतूक ही बंद करू : सतेज पाटील

सुनिल पाटील
Monday, 22 February 2021

कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणारी वाहतूक थांबवली आहे

कोल्हापूर : कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून जाणारी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे भविष्यात कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणारी सर्व वाहतूक बंद करावी लागेल, असा इशारा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिला. 

कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणारी वाहतूक थांबवली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने कर्नाटकात जाणाऱ्यांची पूर्ण तपासणी करूनच त्यांना कर्नाटकात पाठवा अशा सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही भूमिका घेतली आहे.

हेही वाचा- कर्नाटकात प्रवेश बंद ! 72 तासाच्या आतील  कोविड निगेटिव्ह रिपोर्टची मागणी; सीमेवरून वाहने परत

महाराष्ट्र, केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसल्यास कर्नाटकात प्रवेश देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानुसार कर्नाटक शासनाच्या पोलिस प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथून प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांना सोमवार (ता. २२) पासून परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणारी सर्व वाहतूक बंद करावी लागेल, असा इशारा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी  दिला. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Satej Patil warning karnataka stop the traffic coming from Karnataka vehicle marathi news