पालकमंत्र्यांनी पोस्टरबाजी कमी करावी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

"पैशाच्या जोरावर वाटेल ते करू शकतो, अशी भावना असणारे आणि परप्रांतीय मजुरांना जेवण देतानाही फोटो झळकवणारे इव्हेंट करत नाहीत का ? रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा ज्यांनी स्वत:ची छबी असणारी पोस्टर चिकटवली, त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आत्मपरिक्षण करावे,' असा टोला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना त्यांचे नांव न घेता लगावला. महाराष्ट्र बचाव आंदोलनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

कोल्हापूर : "पैशाच्या जोरावर वाटेल ते करू शकतो, अशी भावना असणारे आणि परप्रांतीय मजुरांना जेवण देतानाही फोटो झळकवणारे इव्हेंट करत नाहीत का ? रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा ज्यांनी स्वत:ची छबी असणारी पोस्टर चिकटवली, त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी आत्मपरिक्षण करावे,' असा टोला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना त्यांचे नांव न घेता लगावला. महाराष्ट्र बचाव आंदोलनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 
कोरोना हे संकट आहे, इव्हेंट नव्हे, अशी टिका पालकमंत्री सतेज पाटील यांनी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. त्यावर आज प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले. 

महाडिक म्हणाले,""पालकमंत्र्यांनाच प्रसिद्धाचा हव्यास आहे. गेले दोन महिने चंद्रकांत पाटील कोठे होते?, असा सवाल विरोधी पक्षातील मंडळी करत आहेत. पण प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदार संघात थांबणे आवश्‍यक होते. त्यामुळे ही टिका निरर्थक आहे. शिवाय ज्यांनी गेल्या आठ-दहा दिवसात रेल्वेने जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना दिलेल्या जेवणावरही स्वत:चे फोटो झळकवले हा इव्हेंट नव्हे काय ? त्यांनी पोस्टरबाजी कमी करावी. 

गेल्या दोन महिन्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्वसामान्य- गोरगरीब जनतेला प्रचंड मदत केली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात मास्क, सॅनिटायझर आणि जीवनावश्‍यक वस्तुंचे लाखो लोकांना वाटप झाले. या उलट परप्रांतीयांना मदत करणाऱ्या पालकमंत्र्यांनी स्थानिक नागरीकांच्या गरजा, व्यथा-विवंचना जाणून घ्यायला हव्या होत्या. केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात बसून, कोरोना नियंत्रणात येत नाही, असा टोलाही महाडिक यांनी लगावला. 

रेल्वे खर्चाचा तपशील जाहीर करावा... 
महाडिक म्हणाले,""मुंबई-पुण्यातून येणाऱ्या मुळच्या कोल्हापूरकरांना अडवले जात आहे. पण मानवतेच्या भावनेतून आणि ज्यांच्या घरातले लोक अडकले आहेत, त्यांची तगमग लक्षात घ्यायला नको का ? परप्रांतीय मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च राज्य सरकारच्या मार्फत झाला आहे. शिवाय केंद्र सरकारनेही मुळात सवलत दिली आहे. तरीही आपणच परप्रांतीयांच्या प्रवासाचा खर्च केला, असा आव आणणाऱ्यांनी रेल्वे खर्चाचा तपशील जनतेच्या माहितीसाठी जाहीर करावा.' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister should reduce poster campaign