धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने राधानगरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

धामोड (जि. कोल्हापूर):  राधानगरी तालुक्यातील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नात्यातीलच एकावर गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी जमीर खुदबुद्दीन दरवेशी ऊर्फ पठाण (वय 43, रा. कोगिल बुद्रुक ता. करवीर, जि. कोल्हापूर) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला गुरुवार (ता. 10) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने राधानगरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : राधानगरी तालुक्यातील एका गावात संशयिताच्या मुलीचा विवाह झाला आहे. मुलीच्या घराच्या बांधकामासाठी कोगिल खुर्द येथील गवंडी आणले आहेत. गवड्यांचे साहित्य घेऊन श्री. पठाण कुरणेवाडी येथे आला होता. पीडित मुलीच्या घरी आई, वडील, भाऊ व वहिणी असे एकत्रित राहतात. पीडित मुलीच्या वडिलांचा मासेमारीचा व्यवसाय असून ते सतत बाहेरगावी असतात. काल घरामध्ये भरावा भरण्याचे काम सुरू होते. गुरुवारी (ता. 3) पहाटे जमीर खुदबुद्दीन दरवेशी ऊर्फ पठाण याने अल्पवयीन मुलीशी तोंड दाबून जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. सकाळी श्री. दरवेशी याने पलायन केले. घडला प्रकार मुलीने वडिलांना व आईला सांगितला. त्यानंतर स्वतः पीडित मुलीने पोलिसांत फिर्याद दिली. राधानगरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी जमीर खुदबुद्दीन दरवेशी उर्फ पठाण याला अटक केली. तपास पोलिस निरीक्षक उदय डुबल व उपनिरीक्षक एम. एच. शेख करत आहेत. 

हे पण वाचाशेअर मार्केटमधून जादा परतावा मिळवू देण्याच्या अमिषाने 11 लाखांची फसवणूक

 

संशयिताला कोठडी 
न्यायालयासमोर आज जमीर खुदबुद्दीन पठाण याला हजर केले असता त्याला गुरुवार (ता. 10) पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक एम. एच शेख यांनी दिली. दरम्यान या बलात्कार प्रकरणाने धामोड परिसरात खळबळ उडाली आहे. 
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: harassment for minor girl kolhapur