'चंद्रकांत पाटलांचा जन्म हिमालयात जाण्यासाठीच'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

दोन दिवसांपुर्वी सरकारच्या वर्षपुर्तीबद्दल टीका करताना श्री. पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा जन्म सरकार चालवण्यासाठी नसून पक्ष किंवा संघटना चालवण्यासाठी झाला असल्याची टीका केली होती

कोल्हापूर -उठसूठ हिमालयात जाण्याची भाषा करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा जन्म राजकारणासाठी झाला नसून हिमालयात जाण्यासाठीच झाला असल्याची बोचरी टीका आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे केली. 

दोन दिवसांपुर्वी सरकारच्या वर्षपुर्तीबद्दल टीका करताना श्री. पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा जन्म सरकार चालवण्यासाठी नसून पक्ष किंवा संघटना चालवण्यासाठी झाला असल्याची टीका केली होती. त्याला आज श्री. मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. काही दिवसांपुर्वी श्री. पाटील यांनी कोल्हापुरातील कोणत्याही एका आमदाराने राजीनामा द्यावा, त्या जागेवरून मी निवडून येऊन दाखवतो, निवडून नाही आलो तर हिमालयात जाऊ असे आव्हान दिले होते. त्याचा संदर्भ घेत श्री. मुश्रीफ यांनी आज पत्रकाद्वारे टीका करताना श्री. पाटील यांचा जन्म हा राजकारणासाठी झाला नसून हिमालयात जाण्यासाठीच झाल्याचा पलटवार केला आहे.

हे पण वाचा - शरद पवारांवर माझा अभ्यास सुरू ; लवकरच पीएचडी करणार

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. एका वृत्तवाहिणीशी बोलताना, उद्धव ठाकरे यांना मंत्रालय कुठं होत हे पण माहित नव्हतं, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना अभ्यास वाढविण्याची गरज असल्याचा टोला पाटील यांनी लगावला.    

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hasan mushrif criticism on bjp leader chandrakant patil