पडळकर यांचा बोलविता धनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील  - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

आता आम्ही अशा शिव्या देऊ की त्यांना झोपा लागणार नाहीत. अशी खरमरीत टीका ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. पडळकर यांचा बोलवता धनी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आहेत. आरोप-प्रत्यारोपाला भाजपकडून सुरुवात झाली. आता आम्ही अशा शिव्या देऊ की त्यांना झोपा लागणार नाहीत. अशी खरमरीत टीका ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली.

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, आमचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यावर पडळकर यांनी चुकीच्या शब्दात टीका केली.  मात्र त्यांचे बोलवते धनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. आमच्या पक्षात असे कुणी वक्तव्य केले असते तर पवार साहेबांनी त्यांच्यावर कारवाई केली असती. मात्र भाजपमध्ये पडळकर यांच्या वक्तव्याचे समर्थन केले जात आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांना त्यांनी सुरुवात केली. आता आम्ही अशा ठेवणीतल्या शिव्या देऊ की त्यांना झोपा लागणार नाहीत. ज्याप्रमाणे महात्मा गांधींचा खून केल्यानंतर गोडसेचे उदात्तीकरण केले जात आहे. त्याच पद्धतीने पडळकर यांचे देखील उदात्तीकरण सुरू आहे.

मडिलगेत पडळकरांचा निषेध 
 गोपिचंद पडळकरांचा मानसिक तोल ढासळला असून त्यांना आपण काय बोलतो याचे भान राहिले नाही शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर बोलताना आपली लायकी तपासून बोलावे अन्यथा त्यांना राष्ट्रवादीचा कार्यकर्ता फिरणे मुश्‍कील करेल, असा इशारा माजी सभापती भिकाजीराव गुरव यांनी दिला. मडिलगे (ता. आजरा) येथे गोपिचंद पडळकर यांचा पुतळा जाळण्यात आला. या वेळी ते बोलत होते. आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक सदाशिव जाधव, माजी संरपंच के. व्ही. येसणे, सरपंच दीपकराव देसाई, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर, माजी उपसरपंच बापू निऊंगरे युवराज येसणे, तानाजी कांबळे, प्रकाश कांबळे, उत्तम काणेकर, सुधीर सावंत उपस्थित होते. 

हे पण वाचा - धक्कादायक ; खून प्रकरणातील संशयिताच्या पत्नीने अल्पवयीन मुलाचे अपहरण करून धत्याच्यावर..

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hasan mushrif criticism on devendra fadnavis and chandrakant patil