म्हणून मला राग आला.... मंत्री हसन मुश्रीफांनी 'हे' कारण केले स्पष्ट...

 mushrif explanation on why comment on satej patil
mushrif explanation on why comment on satej patil
Updated on

कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी ना गुप्त संघर्ष आहे ना सुप्त संघर्ष; मात्र महापुरातील थकीत नुकसानभरपाई मिळण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी 'सहकार्य' केले, असा शब्द प्रयोग पाटील यांनी केला. या शब्दामुळेच मला राग आला, असे प्रांजळ मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व्यक्‍त केले. आपल्या या बोलण्यामुळे आमच्यात संघर्ष आहे, वाद आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाटील आपला नेहमीच आदर करतात, असेही त्यांनी सांगितले.

तर्क वितर्क सुरू आहेत

पालकमंत्री सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत महापुरातील भरपाईची मागणी केली. यानंतर 41 कोटी 58 लाख 24 हजारांचे अनुदान मिळाले. हे अनुदान मिळवण्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सहकार्यामुळेच हा निधी मिळाल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या विधानावर मुश्रीफ यांनी आक्षेप घेत पाटील यांच्यापूर्वीच आपण या निधीची मागणी केल्याची आठवण करून दिली. गेली दोन दिवस याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत. याबाबत आज मुश्रीफ यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली.

मुश्रीफ म्हणाले, "दर कॅबिनेट बैठकीला मी हजर असतो. आठवड्यातून दोन-तीन दिवस मी मुंबईत असतो. त्यामुळे यापूर्वीच मी महापुरातील नुकसानभरपाईची मागणी केली आहे. मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्याशी चर्चा केली. यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि सचिव किशोरराजे निंबाळकर यांनाही याबाबत पवार यांनी सूचना दिल्या. या सर्व बाबी पालकमंत्री सतेज पाटील यांना माहिती नाहीत. बऱ्याच दिवसांनी ते मुंबईला गेले असल्याने त्यांनी निधीची मागणी केली आहे. मंजूर झालेल्या निधीसाठी हसन मुश्रीफ यांचे सहकार्य लाभले, असे वक्‍तव्य केले. ते मला खटकले.''
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com