esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

 Hasan Mushrif  warning that lockdown will increase in Kolhapur

 कोल्हापूर जिल्हा ऑरेंज कॅटेगरित गेला आहे. त्यामुळे लोकांनी रसत्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. जणू काही कोरोनावर मात केली आहे, अशा अविर्भावात लोक फिरत आहेत,

Video :...तर कोल्हापुरात लॉकडाऊन वाढेल  ना.मुश्रीफ मुश्रीफ यांचा इशारा.. 

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ऑरेंज कॅटेगरित गेला आहे. त्यामुळे लोकांनी रसत्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. जणू काही कोरोनावर मात केली आहे, अशा अविर्भावात लोक फिरत आहेत, हे योग्य नाही. कोरोनावर अजून लस सापडलेली नाही. त्यामुळे पुढील काही काळ मास्क वापरणे, सोशल डिस्टनसिंग ठेवणे आदी बाबी कराव्या लागणार आहेत. मात्र सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. जर लोकांनी विनाकारण फिरणे थांबवले नाहीतर पुन्हा एकदा लॉकडाउन करावे लागेल, असा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. 

ना. मुश्रीफ म्हणाले, आज सकाळी कागल ते कोल्हापूर प्रवास केला. या दोन्ही शहरात मोठया प्रमाणात लोक बाहेर पडले आहेत. अशा पध्दीतने लोकांनी बाहेर पडणे हा मोठा धोका आहे. अजून कोरोनावर औषध नाही. लस शोधण्याचे काम संशोधक करत आहेत. जोपर्यंत लस, औषध सापडणार नाही तोपर्यंत कोरोनाला घेवूनच वाटचाल करावी लागणार आहे.

हेही वाचा-महाराष्ट्र शासनाचा निर्णय :  कोरोना वॉरियर्सच्या मानधनाला लावली अशी कात्री...

यासाठी डॉक्‍टर व वैज्ञानिकांनी सांगितल्या प्रमाणे तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे व वारंवार हात साबणाने धुणे आवश्‍यक आहे. बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोकांचे जिल्ह्यात आगमन होणार आहे. या येणाऱ्या लोकांची आरोग्य तपासणी करणे व त्यांना 14 दिवस संस्थात्मक अलगीकरण केल्याशिवाय पर्यायच नाही, याबाबत पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. 

हेही वाचा- ब्रेकिंग - इचलकंजीत सापडला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...
 
दोन महिने कमावले ते चार दिवसात गमवाल 
लोक ज्या पध्दतीने रस्त्यावर गर्दी करत आहेत ते गंभीर आहे. गेली दीड दोन महिने लोकांनी घरात थांबून जे कमावले आहे ते दोन चार दिवसात घालवण्याची वेळ येईल, अशी भिती ना. हसन मुश्रीफ यांनी व्यक्‍त केली.त्यामुळे लोकांनी गर्दी करु नये.आजपर्यंत घरात राहून जसे सहकार्य केले तसेच सहकार्य पुढील काळात करावे, असे आवाहन ना.मुश्रीफ यांनी केले.

go to top