ग्रामपंचायत कार्य‍ालयाएेवजी अधिकारी गेले चिंचेच्या बागेत

hatkangale Group Development Officer ignore pattankodoli gram panchayat
hatkangale Group Development Officer ignore pattankodoli gram panchayat

पट्टणकोडोली (जि. कोल्हापूर) : हातकणंगले गटविकास अधिकार्‍यांनी पट्टणकोडोली गावाला भेट दिली. मात्र, ग्रामपंचायत कार्य‍ालयात न जाता  
येथील चिंचेच्या बागेत फक्त ग्रामसेवकांना भेटून निघून गेले. यामुळे रागावलेल्या पदाधिकार्‍यांनी थेट पालकमंत्री, ग्रामविकासमंत्री व संबधित वरिष्ठ अधिकार्‍यांकडेच याबाबत तक्रार करीत कारवाईची मागणी केली आहे.
  

काल इचलकरंजी येथे कोरोनाचा रुग्ण सापडल्याने पट्टणकोडोली येथे आज (मंगळवार) पासून ४ दिवसासाठी लॉकडाऊन अधिक तीव्र करण्यात आला आहे. यासाठी गावाच्या अंतर्गत सीमा व रस्ते बंद करण्याचे काम ग्रामपंचायत व सहनियंत्रण समीती करित होती. यावेळी गटविकास अधिकारी अरुण जाधव हे गावात येणार असल्याचे समजल्याने त्यांच्याशी गावातील नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी ते वाट पहात बसले होते.

गटविकास अधिकारी गावात आले मात्र, ग्रामपंचायतीत येण्याऐवजी ग्रामविकास अधिकार्‍यांना क्लार्क सहित देवस्थान जवळील चिंचेच्या बागेत बोलावून घेतले. त्यांच्याबरोबर चर्चा केली व तेथूनच निघून गेले.
 हुपरी पोलिसांच्या सहाय्याने अहोरात्र क‍ाम करणारे पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कोरोना बचाव नियंत्रण समिती यांना साधे भेटून नियोजनाबाबत माहिती हि घेतली नाही. तसेच ग्रामपंचायत कार्यालयात जाण्याचेही टाळले. त्यामुळे गटविकास अधिकार्‍यांच्या बाबत पदाधिकार्‍यांच्यातून संताप व्यक्त होत आहे.

हे पण वाचा - मुलाने ट्विट केले आणि आईवर सुरू झाले उपचार !                                              

यावेळी उपसरपंच सुरेश भोजे यांनी पालक मंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ व तहसीलदार प्रदिप उबाळे यांना फोन करून गटविकास अधिकारी यांच्या विरोधात संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली. 
याबाबत गटविकास अधिकारी अरुण जाधव यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com