दारूसाठी काय पण! भरदिवसा चोरट्यांनी फोडले बियर बार  

theft in beer bar at kolhapur ichalkaranji
theft in beer bar at kolhapur ichalkaranji

इचलकरंजी - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन असल्याने मद्य विक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे मद्य मिळणे दुरापास्त झाले आहे. मात्र, यामुळे आता बंद असलेले बियर बार चोरट्यांचे लक्ष बनले आहे. सांगली रोडवरील चोरट्यांनी पवन्स हॉटेल चोरट्यांनी फोडले असून 4 हजारांच्या रोकडसह बारमधील चार हजार रुपये किमतीचे विदेशी मद्य लंपास केले आहे.

याबाबतची तक्रार हॉटेल मालक संतोष सुधाकर घोटगे (वय 46, रा. यशवंत रेसिडन्सी, तोरणानगर) यांनी शहापूर पोलिसांत दिली आहे. या घटनेमुळे शहरातील बारमालक व वाईन्स शॉपचालक धास्तावले आहेत. 


लॉकडाऊन असतानाही भरदिवसा मद्य चोरीची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सांगली रोडवरील यड्राव फाट्याजवळ खोतवाडी गावाच्या हद्दीत घोटगे यांच्या मालकीचे पवन्स हॉटेल आहे. हे हॉटेल चोरट्यांनी सोमवारी फोडले. हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या लोखंडी शटर्सच्या दरावाजाचे कुलूप तोडण्यात आले असून त्याच्या आत असलेल्या दरवाजाची काच फोडण्यात आली आहे. त्यातून आत प्रवेश करुन बारमधील मद्य साठा चोरट्यांनी लंपास केला आहे.

यामध्ये मॅकडॉल 4 बाटल्या, मॅकडॉल रेडरम 5 बाटल्या, डीएसपी ब्लॅक 2 बाटल्या, ब्लेंडर स्प्राईड 4 बाटल्या, टुबर्ग बिअर 5 बाटल्या, बडवायझर 4 बाटल्या असा मद्यसाठा व कॅश ड्रॉव्हरमधील 4 हजारांची रोकड असा 8015 चा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला. श्‍वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. लॉकडाऊन असताना सोमवारी भर दिवसा हा चोरीचा प्रकार घडल्याने पोलिस यंत्रणाही चक्रावली आहे.


तपासणी नाका हाकेच्या अंतरावर

चोरी झालेल्या हॉटेलपासून हाकेच्या अंतरापासून तपासणी नाका आहे. या ठिकाणी 24 तास पोलिस बंदोबस्त आहे. त्यामुळे चोरट्यांनी या घटनेने एक प्रकारे पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com