Good News: हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया आता कोल्हापुरात 

Heart transplant surgery now in Kolhapur Facilities available at Apple Hospitals Kolhapur health marathi news
Heart transplant surgery now in Kolhapur Facilities available at Apple Hospitals Kolhapur health marathi news
Updated on

कोल्हापूर : कोल्हापुरातील अॅपल हॉस्पिटलला शासनाकडून हृदय प्रत्यारोपण (हार्ट ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया करण्यास परवानगी मिळाली आहे. या सुविधेमुळे कोल्हापूर हे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपलब्ध असणारे पुणे ते बेंगलोर दरम्यानचे एकमेव शहर ठरले आहे.अशी माहिती प्रमुख  कार्डीऑलॉजिस्ट डॉ. अशोक भूपाळी यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे.


 ते म्हणाले आहेत कि “तरुण वर्गातील व्यक्तींमध्ये हृदयविकाराचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढले आहे. या मध्ये हार्ट अॅटॅक, डायलेटेड कार्डीओमायोपथी या सारख्या विविध प्रकारच्या हृदयविकारांचा समावेश आहे. बहुतांशी रुग्णांमध्ये अॅन्जीओप्लास्टी, बायपास  शस्त्रक्रिया, झडप बदलणे या सारख्या उपचारानंतर बऱ्याचदा हृदयाचे कार्य पूर्ववत होते. पण काही रुग्णांची हृदयाची कार्यक्षमता केवळ २०% किंवा त्यापेक्षाही कमी होते. अशा रुग्णांना कोणतीही औषध प्रणाली लागू पडत नाही. या स्थितीला ‘रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर’ असे संबोधले जाते. या रुग्णांचा कालांतराने मृत्यु होतो”.

‘रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर’, डायलेटेड कार्डीओमायोपथी (हृदयाच्या स्नायूंचा आजार) किंवा अति गंभीर अवस्थेतील जन्मजात हृदयविकार असणाऱ्या रुग्णांसाठी हृदय प्रत्यारोपण (हार्ट ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय उपयोगी ठरतो. 
अॅपल हॉस्पिटल्सल येथे या शस्त्रक्रियेसाठी सुप्रसिद्ध हार्ट सर्जन डॉ. महादेव दीक्षित उपलब्ध असणार आहेत. त्यांच्या टीममध्ये हार्ट सर्जन डॉ.अमृत नेर्लीकर, हृदयविकार तज्ञ डॉ.अशोक भूपाळी, डॉ.अलोक शिंदे , डॉ. विनायक माळी, डॉ.शीतल देसाई तसेच तज्ञ नर्सेस , परफ्युजनिस्ट यांची मोठी टीम उपलब्ध आहे.  हॉस्पिटमध्ये दोन मोड्युलर ऑपरेशन थियेटर  आय.सी.यु. उपलब्ध आहे.  

हेही वाचा- अभिमानास्पद! एकाच कुटुंबातील सहा बहिणी पोलिस खात्यात: वडिलांचे स्वप्न केले पूर्ण
   
 डॉ. दीक्षित म्हणाले , “ मी माझ्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत जवळपास २५,००० हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत.तसेच बंगलोर येथे कार्यरत असताना हृदय प्रत्यारोपणशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. ही सुविधा पूर्वी कोल्हापुरात उपलब्ध नसल्याने ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचे हृदय मुंबई , बेंगलोर ,चेन्नई इत्यादी मोठ्या शहरात विमानाने पाठवावे लागत होते. या प्रक्रियेस बराच कालावधी लागतो. परंतु आता कोल्हापुरातच हृदय प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध झाल्याने‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णाचे हृदय काढल्यानंतर प्रत्यक्ष हृदय प्रत्यारोपण  शस्त्रक्रियासाठी लागणारा कालावधी हा बराच कमी होणार आहे.

‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णाचे हृदय काढल्यानंतर ६ तासांच्या आत त्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे असते. तसेच शस्त्रक्रियेच्या खर्चाव्यतिरिक्त विमान सुविधा उपलब्ध करण्यासाठीचा मोठा आर्थिक भार रुग्णावर पडायचा तो देखील कमी होणार आहे. हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कोल्हापुरात उपलब्ध झाल्याने त्याचा पश्चिम महाराष्ट्रातील गरजू व्यक्तींना मोठा फायदा होणार आहे अशी माहिती संस्थेच्या डायरेक्टर गीता आवटे यांनी दिली.

संपादन-अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com