मोठी बातमी; कोल्हापूरमध्ये होणार मूसळधार पाऊस 

Heavy rains in Kolhapur
Heavy rains in Kolhapur

कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारपासून (ता. 15) पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानूसार 15 ऑगस्ट ते मंगळवार (ता. 18 ऑगस्ट) पर्यंत जिल्ह्यात मूसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पंचगंगा, वारणा, दुधगंगा व घटप्रभा खोऱ्यातील नद्यांना पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. 

आज दुपारी 1:50 पर्यंत पंचगंगा खोऱ्यातील राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे. चार दरवाज खुले आहेत. यातून 7112 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी वातळी वाढत आहे. 

दरम्यान, राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी 37.7 फुट आहे. पंचगंगा व भोगावती नदीवर असणारे 21 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली आहेत. 

वारणा खोरे 
वारणा धरण 92 टक्के भरले आहे. 14 हजार क्‍यूसेक पाण्याखा विसर्ग सुरु आहे. धरण क्षेत्रात मूसळधार पाऊस सुरु आहे. वारणेची उपनदी कडवी धरण 100 टक्के भरले आहे. यातून 2511 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वारणा नदीची पाणी पातळी अजून 3 फुटांनी वाढण्याची शक्‍यता आहे. तर, वारणा नदीवरील 8 व कडवी नदीवरील 8 बंधारे पाण्याखाली आहेत. 

दूधगंगा खोरे 
दूधगंगा धरण 93 टक्के भरले आहे. दूधगंगा व मुक्त पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. 12 हजार 12950 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर, पाटगाव धरण 100 टेक्‍क भरले आहे. 

घटप्रभा खोरे 
घटप्रभा खोऱ्यातील चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर, हिरण्यकेशी नदीवरील 11, घटप्रभा 7, ताम्रपर्णी नदीवरील 8 कोल्हापूर बंधारे पाण्याखाली आहेत. 

संपादन- धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com