जोरदारह पावसाने राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले

सुनील पाटील
Thursday, 24 September 2020

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचे तीन दिवसापासून पुन्हा आगमन झाले. झालेल्या जोरदार पावसामुळे आज पहाटे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. राधानगरी धरणातून 4 हजार 256 क्‍युसेक, कोयनेतून 1050 तर अलमट्टी धरणातून 38 हजार 922 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचे तीन दिवसापासून पुन्हा आगमन झाले. झालेल्या जोरदार पावसामुळे आज पहाटे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. राधानगरी धरणातून 4 हजार 256 क्‍युसेक, कोयनेतून 1050 तर अलमट्टी धरणातून 38 हजार 922 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 
दुपारनंतर सायंकाळपर्यंत पावसाने उघडीप दिली त्यानंतर तुरळक पावसाने हजेरी लावली. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी 14.11 फुट आहे. जिल्ह्यातील जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, चिकोत्रा मध्यम प्रकल्प, दूधगंगा मोठा प्रकल्प व कुंभी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. याशिवाय, पंचगंगा नदीवरील इचलकरंजी व भोगावती नदीवरील खडक कोगे हे दोन बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात आणखी काही दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 
दाजीपूर येथे 156 मिलिमीटर पाऊस 
राधानगरी : गेल्या दोन दिवसात राधानगरी तालुक्‍यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाने जोर धरल्याने धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. आज पहाटे राधानगरीच्या सात स्वयंचलित दरवाजे पैकी दोन दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत. धरणातून 4256 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. 24 तासात दाजीपूर येथे तब्बल 156 मिलिमीटर तर धरणक्षेत्रात 65 मिलिमीटर पाऊस नोंदला. आवक मोठी असल्याने आज पहाटे धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. क्रमांक तीन आणि सहा हे दरवाजे खुले झाले त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
दरम्यान काळम्मावाडी धरण क्षेत्रात पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्याने 5 वक्राकार दरवाजे काल रात्री 25 सेंटिमीटरने उघडण्यात आले होते. यातून व वीज निर्मितीसाठी असे पाच हजार क्‍युसेक पाणी दूधगंगा नदीत सोडला होता तो 1300 ने कमी केला आहे. सध्या धरण व विजगृहातून मिळून 3700 क्‍यूसेक केल्याने या नदीची पूर स्थिती किंचीत कमी झाली आहे. 

गगनबावड्यात 100 मिलीमीटर पाऊस 
गगनबावडा: गगनबावडा, सांगशी पंचक्रोशीत काल सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासात तालुक्‍यात सरासरी 100.50 मि.मी.पाऊस झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains opened two gates of Radhanagari dam