
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघात प्रचाराचा धुरळा उडवला
कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी कोल्हापूर, सांगली, सातार, पुणे व सोलापूर जिल्ह्यात गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचारात उतरले. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचार आणि होणाऱ्या सभांमध्ये व्यस्त असणाऱ्या श्री पाटील यांनी आज मतदानादिवशी कोल्हापूर येथील शिवाजी पेठेतील एका हॉटेलमध्ये झणझणीत मिसळीवर ताव मारला. याच ठिकाणी त्यांनी कोल्हापूरसह पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील मतदान कसे व किती टक्के झाले याची माहितीही घेतली.
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघात प्रचाराचा धुरळा उडवला. गेल्या काही दिवसांपासून पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या धामधूमीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार इर्षेने सुरु ठेवला. आज मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच जिल्ह्यातील शिक्षक व पदवीधर मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले आहे.
हे पण वाचा - आपण आता अमित शहांची कॉलर धरू ; राजू शेट्टींचा खणखणीत इशारा
सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बूथवर जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी, कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथील सुप्रसिद्ध हॉटेल विठाई येथे महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांसोबत कोल्हापूरी मिसळीचा आस्वाद घेत मतदानाचा आढावाही घेतला.
हे पण वाचा - जयंत पाटील भाजपात येणार होते? चंद्रकांत पाटील यांचं सूचक उत्तर
संपादन - धनाजी सुर्वे