पतीकडून पत्नीची सोशल मीडियावरून बदनामी 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

महिलांची बदनामी केल्याप्रकरणी पतीवरच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत पत्नीनेच पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

कोल्हापूर - कौटुंबिक वादातून सोशल मिडियावर बनावट अकौंट काढून त्याआधारे अक्षेपार्ह संदेश व्हायर करून पत्नीसह नातेवाईक महिलांची बदनामी केल्याप्रकरणी पतीवरच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत पत्नीनेच पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्ह्यातील एका कुटुंबात पती व पत्नीच्यात गेल्या वर्षापासून कौटुंबिक वाद सुरू आहे. याच वादातून पतीने पत्नीसह तिच्या नातेवाईक महिलांची बदनामी करण्याच्या उेद्‌शाने सोशल मीडियावर एक बनावट औंकट काढले. त्यावर बदनामी करणारे संदेश व्हायरल केले. तसेच वेगवेगळ्या व्यक्‍तींच्या नावे मोबाईलवरून अश्‍लील संदेश पाठवून बदनामी करण्याचा प्रकार केला. अशी फिर्याद पत्नीने पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात संबधित पतीवर विनयभंग व बदनामी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हे पण वाचानोकरी जाण्याची धास्तीने संगणकीय अभियंत्याची आत्महत्या

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband defames wife on social media