ब्रेकिंग - इचलकरंजी पुन्हा 14 दिवस 100 टक्के लाॅकडाऊन.....

halkaranji again 14 days 100 percent lockdown kolhapur marathi news
halkaranji again 14 days 100 percent lockdown kolhapur marathi news
Updated on

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरातील 100 टक्के लॉकडाउनचा कालावधी 14 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आला आहे. रविवार (ता.5) रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत हा लॉकडाउन शिथील करण्यात येणार आहे. यावेळेत नागरिकांना किराणा माल, धान्य व अन्य जीवनावश्यक वस्तू यासह नगरपालिकेने नेमून दिलेल्या 22 ठिकाणी भाजीपाला खरेदी करता येणार आहे. त्यानंतर 14 तारखेपर्यंत पुन्हा शहर लॉकडाउन असणार आहे. अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली.

या वेळेतच अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

सकाळी 6 ते 9 या वेळेत दुध विक्री व दिवसभर औषध व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तसेच शहरातील वेगवेगळ्या 22 ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांना सोशल डिस्टन्स ठेवत पायी चालत जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील पुकारलेला तीन दिवस 100 टक्के लॉकडाउन यशस्वी झाल्याने प्रांत कार्यालयात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनाबाबत बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत लोकप्रतिनिधी, पोलिस, आरोग्य, नगरपालिका व प्रशासनाचे सर्व अधिकार्‍यांनी याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी सर्वानुमते इचलकरंजी शहर पुन्हा 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उपस्थिती

यावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, मुख्याधिकारी दिपक पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपाधिक्षक गणेश बिरादार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. आर. आर. शेटे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, वाहतूक शाखेचे नंदकुमार मोरे यासह शहरातील तीनही पोलिस स्टेशनचे प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा-संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या कोल्हापूरातील या साखर कारखान्याच्या एम डी वर गुन्हा दाखल.... ​

शिथील कालावधीत वाहनांना बंदी
शहरात 14 एप्रिल पर्यंत 100 टक्के लॉकडाउन असताना रविवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत हा लॉकडाउन शिथील करण्यात येणार आहे. या वेळेत नागरिकांना भाजीपाला, किराणा माल, धान्य खरेदीला मुभा देण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी खरेदीसाठी पायी चालत घराबाहेर पडण्याच्या सुचना केल्या आहेत. यावेळी रस्त्यावर वाहने आढळल्यास जप्त केली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com