इचलकरंजीत टंचाईचे संकट टळले, दिवसात पाणी गळती दुरूस्त

पंडित कोंडेकर
Thursday, 24 September 2020

इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्याकृष्णा योजनेला लागलेली गळती काढण्याचे काम आज एका दिवसातच युद्ध पातळीवर पूर्ण केले.

इचलकरंजी : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्याकृष्णा योजनेला लागलेली गळती काढण्याचे काम आज एका दिवसातच युद्ध पातळीवर पूर्ण केले. त्यामुळे कृष्णा नदीतून पाणी उपसा सुरू केला असून उद्यापासून (ता. 24) शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. 

शिरढोणनजीक असलेल्या पंचगंगा नदीजवळ जलवाहिनीला मोठी गळती लागली होती. त्यामुळे गळती तातडीने काढण्याशिवाय पालिकेसमोर पर्याय नव्हता. गळती मोठी असल्याने किमान दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्‍यता होती. त्यादृष्टीने नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याबाबत आवाहन केले होते. मात्र, आज युद्ध पातळीवर गळती काढण्याचे काम हाती घेतले. या कालावधीत कृष्णा नदीतील पाणी उपसा बंद ठेवला होता. 

दरम्यान, सायंकाळी गळती काढण्याचे काम पूर्ण झाले. एका दिवसात हे काम पूर्ण झाले असून, कृष्णा नदीतून पाणी उपसा सुरू केला आहे. उद्यापासून (ता.24) शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी दिली. यामुळे शहरातील संभाव्य पाणी टंचाई टळली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

 

संपादन - सचिन चराटी

 

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ichalkaranji Water Supply Smooth From Today Kolhapur Marathi News

Tags
टॉपिकस
Topic Tags: