भांगलाय बसा गं माय... पण एक आड एक सरी सोडून...!

 implemented social distancing in agricultural work chandgad
implemented social distancing in agricultural work chandgad

चंदगड  - कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सोशल डिस्टन्सींग हा प्रभावी उपाय आहे. लॉक डाऊनमुळे बाजारपेठा, प्रक्रिया उद्योग आदी बंद असले तरी शेतीची कामे मात्र सुरूच आहेत. सध्या ऊस, भाजीपाला पिकाची भांगलण -खुरपणं सुरू असून या कामातही हा नियम पाळला जात आहे. प्रशासनाकडून थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात असल्याने किमान रस्त्याकडेच्या शेतातून सोशल डिस्टन्सींग दिसून येत आहे.

कोरोनाने अवघे जग विळख्यात घेतले आहे. त्यावर ठोस वैद्यकीय उपाय सापडला नसला तरी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींग यावर भर देण्यात आला आहे. त्याचे परिणाम चांगले दिसून येत आहेत. शहरात, तालुका तसेच मध्यवर्ती बाजारपेठांच्या गावातून संचारबंदी मुळे सर्व व्यवहार बंद असले तरी शेतीची कामे मात्र केल्याशिवाय पर्याय नाही. तालुक्यात ऊस पिकाची भांगलण, नांगरट करून खतांची मात्रा देण्याची कामे सुरू आहेत. भाजीपाला पिकाची खुरपणी करणे, खताची मात्रा देणे, परिपक्व भाजीपाला काढणे आदी कामे केली जात आहेत. मजुरांबरोबरच सध्या गावाकडे आलेले शहरातील नातेवाईकही या कामात मदत करीत आहेत. पाच, दहा लोक एका शेतात काम करताना त्यांनी नियम पाळावेत यासाठी प्रशासन आग्रही आहे. थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. पिकाची एक आड एक सरी सोडून मजुरांनी काम करावे अशी सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे 'गजालीं'ना मर्यादा आली आहे. दुपारचे जेवण घेतानासुध्दा चार फुटाचे अंतर ठेवण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या रस्त्याने फिरत असल्याने रस्त्याकडेच्या शेतातून हे नियम पाळूनच काम केले जात असल्याचे दिसून येत आहे. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ए. एस. सावळगी म्हणाले, "शेतात काम करताना, दुपारचे जेवण घेताना शेतकरी कुटुंबीय मजूर एकत्र येत आहेत. त्यात शहरातून आलेल्या नातेवाईकांचाही समावेश आहे. त्यामुळे संसर्गातून अपायकारक काही घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com