बिराजदार मामा, पुजारी आण्णां बरोबर लढलेले कोल्हापुचे वस्ताद रंगराव ठाणेकर काळाच्या पडद्याआड...

kolhapur wrestler rangrao thanekar no more
kolhapur wrestler rangrao thanekar no more

कोल्हापूर - मार्केट यार्डमधील शाहू कुस्ती आखाड्याचे वस्ताद रंगराव ठाणेकर (वय ७५) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे निधन झाले. ते चाळीस वर्षे आखाड्यातील मल्लांना मार्गदर्शन करत होते. ते मूळचे बजागवाडी (ता. शाहूवाडी) येथील.‌ कोल्हापुरातील काळाईमाम तालमीत त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. त्यांनी दोन वेळा महाराष्ट्र चॅम्पियनचा किताब पटकावला होता. उत्तर भारतीय मल्लांविरुद्ध लढणारा मल्ल म्हणून त्यांची ओळख होती. 

हरिश्चंद्र बिराजदार व शंकर पुजारी विरुद्ध त्यांच्या प्रेक्षणीय लढती झाल्या. भारत केसरी राकेश पटेल, महाराष्ट्र केसरी बाला ‌रफिक शेख, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, रमेश पुजारी, महेंद्र देवकाते, अप्सर जाधव, विष्णू झुरळे, अभिजित शिंदे, सागर गदादे, राजू झुरळे मल्ल त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडले.

सोलापूर, नगर, पुणे, सातारा, सांगलीतील मल्लांना मार्गदर्शन करण्यासाठी ते रोज आखाड्यात हजेरी लावत होते. विना मानधन ते मल्लांना डावपेच शिकवत होते.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.रक्षाविसर्जन रविवारी (ता. १२) होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com