भोंदुबाबाने घातला तब्बल ३५ लाखांना गंडा ; पती-पत्नीस अलिप्त राहण्याचा द्यायचा सल्ला

impostor Fraud of Rs 35 lake in kolhapur
impostor Fraud of Rs 35 lake in kolhapur

कोल्हापूर - अंगात देवाचा अवतार येत असल्याचे सांगून भक्ताला 35 लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी दोन भोंदूबाबांसह त्याच्या साथिदार महिलेला जुना राजवाडा पोलिसांनी आज अटक केली. या त्रिकुटाकडून आणखी काही जणांना सुमारे तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिस या तक्रारींची चौकशी करत आहेत. 

संशयितांची नावे ः प्रवीण विजय फडणीस (वय 55, रा. कसबा तारळे, राधानगरी), श्रीधर नारायण सहस्त्रबुद्धे (वय 50, रा. फुलेवाडी चौथा बसस्टॉप) आणि सविता अनिल अष्टेकर (वय 35, रा. मंगळवार पेठ) अशी आहेत. मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन पिछाडीस असणाऱ्या मठासह कसबा तारळे येथे सात वर्षापासून हा प्रकार सुरू होता. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, संदीप प्रकाश नंदगावकर (वय 38) हे देवकर पाणंद येथे राहतात. मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन पिछाडीस संशयित प्रवीण फडणीस, श्रीधर सहस्त्रबुद्धे या दोघांनी एक मठ सुरू केला. या मठात संशयित सविता अष्टेकर ही त्या दोघांना मदत करायची. या मठात नांदगावर हे नित्यनियमाने कुटुंबासोबत जात होते. मठात असणाऱ्या संशयित प्रवीण फडणीस त्याचा गुरू श्रीधर सहस्त्रबुद्धे आणि त्यांची मदतनीस संशयित सविता अष्टेकर या तिघांनी मिळून फडणीस याच्या अंगात स्वामींचा संचार होऊन त्यांची ताकद त्याला प्राप्त होते. तसेच सहस्त्रबुद्धे याच्या अंगात बाबांचा संचार होतो. "देवांचा आदेश आहे, त्यांच्या रुपाने आम्हीच बोलतो' असे भासवून नंदगावर व त्यांच्या कुटुंबीयांचा त्या तिघांनी विश्‍वास संपादन केला. त्याआधारे 2013 पासून ते 11 मार्च 2020 अखेर त्यांच्याकडून तब्बल 35 लाख रूपये मठात आणि कसबा तारळे येथे घेतले. पण ती रक्कम परत केली नाही. नांदगावर यांच्य भावाकडूनही त्यांनी पैसे घेतले. पण तेही परत केले नाहीत. नंदगावकर यांच्यासह काही जणांनी फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी थेट पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केल्या. त्यांनी तात्काळ पुढील कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर गुरूवारी (ता.28) रात्री मंगळवार पेठेतील मठात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व जुना राजवाडा पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकून संशयित फडणीस, सहस्त्रबुद्धे आणि अष्टेकर या तिघांना अटक केली. त्या तिघांवर फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्या तिघांना न्यायालयाने सात दिवसांची  पोसिस कोठडी सुनावली आहे. 

ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक योगेश पाटील व त्यांच्या पथकांने केली. 

पती पत्नीस अलिप्त राहण्याचा सल्ला... 

संशयित प्रवीण फडणीस हा भोंदूगिरी करत होता. दैवी प्रकोपाची भिती घालून पती, पत्नीस एकमेकांपासून अलिप्त राहण्याचा सल्ला देत होता. त्यांच्याकडून रक्कमेची मागणी करून गंडा घालत असे. त्याला संशयित श्रीधर सहस्त्रबुद्धे हा सावज शोधून देत होता. संशयित सविता अष्टेकर ही दोघांना मदत करत असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली असल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले. 


फसवणूक तीन कोटीच्या घरात...

भोंदूबाबांवर विश्‍वास ठेऊन भक्तांनी रोख स्वरूपात आणि बॅंकेतून कर्जे काढून अडीच कोटींहून अधिकची रक्कम व साडेनऊ लाख रुपये किमंतीहून अधिकचे सोने अशी सुमारे पावणे तीन कोटी रूपये दिले असून आपली फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू असून आणखी कोणाची फसवणूक झाली असेस त्यांनी थेट जुना राजवाडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com