लय भारी; आता एसटी बसही करणार मालवाहतूक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

राज्य परिवहनच्या कोल्हापूर विभागातर्फे मालवाहतूक बसगाडीच्या उदघाटन झाले. 

कोल्हापूर : एसटी बसची विश्वासाहर्ता असल्यामुळे माल वाहतुकीतही तिची सेवा प्रभावी ठरेल, असा विश्वास परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. राज्य परिवहनच्या कोल्हापूर विभागातर्फे मालवाहतूक बसगाडीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. 

मध्यवर्ती बस स्थानक परिसरात कार्यक्रम झाला. यावेळी पाटील म्हणाले, "एसटी म्हणजे विश्वास हा राज्यातील प्रवाशांनी अनुभवला आहे. ही विश्वासाहर्ता कर्मचाऱ्यांनी टिकवून ठेवली आहे. ज्या बसगाड्या सुरक्षित आहेत. मात्र, प्रवासी वाहतुकीसाठी त्या  वापरल्या जात नाहीत. त्या माल वाहतूक करण्यासाठी वापरण्याचा निर्णय राज्य परिवहन विभागाने घेतला आहे. त्यानुसार राज्यात ३५० मालवाहतूक बसगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यात ११ बसगाड्यांचा समावेश आहे."

हे पण वाचा - फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची ‘हसीन’स्वप्ने; वाचा, कोणी केली टीका? ​

ते म्हणाले, "सरकारी कामकाजासह बालभारती सारख्या कामांना वेग येईल. कोरोनाच्या काळात बसगाड्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. कोकणातील आंबा आणि इतर कामासाठी गाड्या उपयोगी आल्या‌. एसटीच्या माध्यमातून राज्यात मालवाहतुकीच्या आतापर्यंत १९०० फेऱ्या झाल्या आहेत. यातून एसटी महामंडळाला दीड कोटी रुपयांचा नफा मिळला आहे."

यावेळी उपमहापौर संजय मोहिते, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, आगार व्यवस्थापक अजय पाटील, डिटीओ शिवराज जाधव, स्थानक प्रमुख दयानंद पाटील उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of freight bus in kolhapur