शिवाजी विद्यापीठाच्या "जिओइन्फॉर्मेटिक्‍स'च्या 17 विद्यार्थ्यांना आंतराष्ट्रीय संधी 

International opportunities for 17 students of Geoinformatics of Shivaji University
International opportunities for 17 students of Geoinformatics of Shivaji University
Updated on

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील भूगोल अधिविभागामधील जिओइन्फ़ोर्मेटीक्‍स (भौगोलिक माहिती प्रणाली) या पदवीत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थांची विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय संस्थांमध्ये निवड झाली. 

यामध्ये स्टुडिओ गॅली (पनामा ग्रुप), जेनसी इंटरनॅशनल, डिडुस टेक्‍नॉलजीस या संस्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही विद्यार्थांची निवड ही लॉकडाऊन काळामध्ये वर्कफ्रॉम होम या आधारे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये झाली होती. याच बरोबर काही विद्यार्थी अग्रीकल्चर ऑफिस कोल्हापूर येथे जी.आय.एस टेक्‍नेशियन्स म्हणून रुजू झाले आहेत.  2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये जी.आय.एस टेक्‍नीक, जी.आय.एस ऍनॅलिस्ट, जी.आय.एस.एक्‍झेकेटीव्ह, जी.आय.एस डेव्हलपर्स म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. सध्या जिओइन्फ़ोर्मेटीक्‍स भूमापन, सर्वेक्षण, हवामान सर्वेक्षण, अर्बन प्लानिंग, ड्रोन (यु.ए.व्ही) सर्वेक्षण इ. व इतर क्षेत्रात प्रभावी भूमिका बजावत आहे. या वर्षी जागतिक कोरोना संसर्गजन्य परिस्थिती असताना देखील जवळपास 80 टक्के पेक्षा अधिक विद्यार्थांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संधी प्राप्त झाली ही भूगोल अधिविभागासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. निवड झालेल्या विद्यार्थामध्ये ऋषिकेश देवकुळे, अनुराग कुलकर्णी, मारुती चिलामे, प्राजक्ता घाटगे, दीपक क्षीरसागर, प्राजक्ता कुंभार, शीतल कातावर, अक्षय पाटील, आशिष पाटील, विशाल पाटील, तुषार वाघ, वैष्णवी साळुंखे, सुशांत सौन्दाडे, रागिणी थालाल यांचा समावेश आहे. यासाठी यांना अधिविभागप्रमुख डॉ. एस. डी. शिंदे, कोर्स कोर्डीनेटर डॉ. एस. एस. पन्हाळकर, डॉ. पी. टी. पाटील, प्रा. अभिजित पाटील, प्रा. व्ही. ए. चौगुले व प्रा. सुधीर पोवार यांचे मार्गदर्शन लाभले. 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sahyadri Express
Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Marathi News Esakal
www.esakal.com