शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची उत्सुकता शिगेला 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 September 2020

आज होणाऱ्या मुलाखतीत माजी प्रशासकीय अधिकारी आणि प्राध्यापकांचा समावेश आहे.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी आज (दि. २६) आणि रविवारी (ता. २७) मुलाखती होत आहेत. दोन टप्प्यांत मुलाखत प्रक्रिया होत असून, कुलगुरूपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे.

आज होणाऱ्या मुलाखतीत माजी प्रशासकीय अधिकारी आणि प्राध्यापकांचा समावेश आहे. माजी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. व्ही. जे. फुलारी, डॉ. डी. जी. कणसे, डॉ. आर. व्ही. शेजवळ, पी. पी. माहुलीकर, डॉ. के. सी. देशमुख, प्रदीप कुंडल, जी. एन. शिंदे, एल. एम. वाघमारे, दीपक पानस्कर, एम. बी. मुळ्ये, डब्ल्यू. के. सरवदे, एम. व्ही. काळे, तर रविवारी आनंद भालेराव, विनायक देशपांडे, मिलिंद उमेकर, अनुभा खळे, अविनाश कुंभार, अंजली कुरणे मुलाखतीस सामोरे जाणार आहेत.

हे पण वाचा - आरोग्य राज्यमंत्री प्रेमींच्या मनात ठसलाय ; ९८८९ नंबर चांगलाच बसलाय 

दरम्यान, डाॅ. देवानंद शिंदे यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यांमुळे सध्या पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितिन कळमळकर शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. दोन दिवतात मुळाखती पुर्ण झाल्यानंतर लवकरच शिवाजी विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळणार आहेत. सध्या मुलाखती सुरू असल्याने कुलगुरूपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे.  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interviews for the post of Vice Chancellor of Shivaji University