प्रामाणिकपणाला सलाम : इस्त्रीसाठी दिलेल्या कपड्यातून आलेली सोन्याची चेन केली परत 

Ironing clothes gold chain kolhapur
Ironing clothes gold chain kolhapur

इचलकरंजी - इस्त्रीसाठी दिलेल्या शर्टाच्या खिशातून मिळालेली एक तोळ्याची सोन्याची चेन ग्राहकाला बोलावून परत दिल्याचा प्रामाणिकपणा येथील लिगाडे मळा भागातील सुयोग ड्रायक्लीनर्सचे मालक शिवाजी परीट व दशरथ परीट या बंधूंनी दाखवला.

बोरगाव येथील शांताराम भोसले हे कामानिमित्त सतत इचलकरंजीला येत असतात. ते इस्त्री करण्यासाठी कपडे लिगाडे मळा येथील सुयोग ड्रायक्लीनर्स या दुकानात नेहमी देतात. मागील आठवड्यात त्यांनी वडिलांच्या उपचारासाठी गळ्यातील सोन्याची चेन विक्री करण्याचे ठरवले. परंतु, बँकेमध्ये सोमवारी येण्यासाठी सांगितल्यामुळे चेन तसीच खिशात ठेवून दिली. अनावधानाने चेन तशीच शर्टाच्या खिशात राहिली व कपडे धुवून इस्त्रीसाठी टाकले. 
इस्त्री करताना परीट बंधूंना सोन्याची चेन सापडली. त्यांनी  तत्काळ भोसले यांना दूरध्वनी करून बोलावून घेतले व चेन परत दिली. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे भारावून जाऊन भोसले यांनी भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानले.  

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com