आयटीआयचे "लॉक' सात महिन्यांनी उघडले

दीपक कुपन्नावर
Thursday, 29 October 2020

शाळा, महाविद्यालये सुरु करण्यासाठी तारिख पे तारिख सुरु असताना राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) सुरळीत कामकाज सुरू झाले.

गडहिंग्लज : शाळा, महाविद्यालये सुरु करण्यासाठी तारिख पे तारिख सुरु असताना राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) सुरळीत कामकाज सुरू झाले. येथील शासकीय आयटीआय सात महिन्यानी योग्य खबरदारी घेऊन दोन शिप्टमध्ये सुरु झाले असुन विद्यार्थ्यानी शेंद्री माळ परिसर गजबजुन गेला. याठिकाणी अकरा कोर्समध्ये 600 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. 23 नोव्हेंबरपासून परिक्षांना प्रारंभ होणार आहे.

अधिक विद्यार्थी क्षमतेचे कोल्हापूर जिल्हातील दुसऱ्या क्रंमाकाचे येथील आयटीआय आहे. शेंद्री माळावर नजरेत भरणारा तब्बल 25 एकर परिसर या संस्थेचा आहे. जोडारी, विजतंत्री, रेफ्रिजरेशन अन्ड एअरकंडीशनिंग, यांत्रिक मोटार गाडी, यांत्रिक डिझेल, कातारी, मशिनिष्ट, सांधाता, पंप आँपरेटर, तारतंत्री, ड्रेसमेकींग असे 11 कोर्स याठिकाणी शिकविले जातात. एकुण 30 शिक्षक, कर्मचारी कार्यरत आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना याठिकाणी प्रवेश दिला जातो. दरवर्षी कॅंम्पस इंटिरिव्हू मधुन पुणे, मुंबई, कोल्हापूर येथील नांमाकित उद्योगसमुहात बहुतांशी येथील विद्यार्थी निवडले जातात. 

सध्या रोज दोन शिप्टमध्ये येथील आयटीआयचे कामकाज सुरू आहे. पहिली शिप्ट सकाळी साडेसातला सुरू होऊन तीनला संपते. दुसरी सकाळी दहा वाजता सुरू होऊन साडे पाच वाजता सुटते. यंदाची वार्षिक परिक्षा पुढील महिन्यात सुरू होणार आहे. प्रात्यक्षिक परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असुन 23 नोव्हेंबरपासून ही परिक्षा आहे. त्यानंतर लेखी परिक्षा होणार आहे. दरम्यान, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रथम वर्षाचे आयटीआय प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या पेचामुळे पहिल्या फेरीनंतर थांबविली आहे. 

परिसर रोज सॅनिटायझ
शासनाच्या सुचनेनुसार गेल्या आठवड्यापासून आयटीआयमध्ये शैक्षणिक कामकाज सुरू केले. विद्यार्थ्यांना मास्क सक्तीचे असुन प्रात्यक्षिक अथवा लेक्‍चरला फिजिकल डिस्टन्स राखले जात आहे. परिसर देखील रोज सॅनिटायझ केला जातो. 
- महेश आवटे, प्राचार्य, आयटीआय, गडहिंग्लज

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ITI's "lock" Opened Seven Months Later Kolhapur Marathi News