चंदेरी नगरीत सन्नाटा...चांदी उद्योगाची चक्रे थांबली...

बाळासाहेब कांबळे:
Sunday, 22 March 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यु च्या आवाहनाला हुपरी परिसरात जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

हुपरी (कोल्हापूर) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यु च्या आवाहनाला हुपरी परिसरात जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. चांदी नगरी हुपरी सह परिसरातील रेंदाळ, रांगोळी, यळगुड, पट्टण कोडोली, तळंदगे, इंगळी आदी गावात कडकडीत बंद असून जनता कर्फ्यु मध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 

चांदी उद्योगाची सर्व चक्रे थांबली

हुपरी येथील नेहमी गजबजलेल्या मुख्य मार्गासह जुने बस स्थानक, नगरपालिका, हुतात्मा स्मारक मैदान, नरके खण, महावीर नगर, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा शाहू नगर, नवीन बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, शिवाजी नगर जवाहर चौपाटी परिसरासह अंबाबाई मंदिर, चिटणीस चौक, बाजारपेठ, गावभागातील छत्रपती शिवाजी चौक आदी ठिकाणी रस्त्यावर चिटपाखरूही फिरताना दिसत नसल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा- Photo : जगात भारी आम्ही कोल्हापुरी... जनता‌ कर्फ्यूला सन्नाटा...

एरवी अन्य कारणांनी पुकारलेल्या बंदच्या काळात चांदी उद्योग, व्यवसाय सहसा बंद मध्ये सहभागी होत नाहीत. मात्र, आजच्या जनता कर्फ्यु मध्ये चांदी उद्योगाची सर्व चक्रे थांबली गेली आहेत. 

हेही वाचा- ब्रेकिंग :दहावीची परीक्षा पुढे ढकलली, एप्रिलच्या या आठवड्यात होणार परीक्षा...

स्वच्छता व साफसफाईही

हुपरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांची फौजफाट्यासह परिसरात गस्त सुरू आहे. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अकारण आढळून येणाऱ्यांना पिटाळून लावले जात आहे. आज जनता कर्फ्यु पाळला जात असतानाच शहरात सकाळी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यां कडून स्वच्छता व साफसफाईचे काम सुरू होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: janta carfew Strong response in the Hupri area kolhapur marathi news