50 वर्षांच्या जटांचे केले निमूर्लन

Jata Nimurlan Activity By `Annis` In Gadhinglaj Taluka Kolhapur Marathi News
Jata Nimurlan Activity By `Annis` In Gadhinglaj Taluka Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील नाथ संप्रदायातील शामराव कृष्णा सुतार (वय 75) यांचे जटानिर्मूलन करण्यात आले. गेल्या 50 वर्षांपासून ते तब्बल पाच फुटापेक्षा अधिक लांबीच्या जटांचा भार सांभाळत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या जटा "अनलॉक' केल्या. तालुक्‍यात सुरू असलेल्या जटा निर्मूलन चळवळीला कोरोनामुळे ब्रेक लागला होता. पण, सुतार यांच्या जटानिर्मूलनाने पुन्हा गती मिळाली आहे. 

शामराव सुतार घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मुंबईला गेले. त्याच ठिकाणी त्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. काही काळानंतर त्यांच्या डोक्‍यात जट निर्माण झाली. 1970 मध्ये त्यांनी त्या जटांचे निर्मूलन केले. मात्र, पुन्हा जट निर्माण झाली. यल्लमा देवीची जट आहे, ती काढली, तर पुन्हा येणारच. त्यामुळे जटेला हात घालू नका, अशी भीती निर्माण केली. दिवसेंदिवस ती वाढत जाऊन पाच फुटापेक्षा अधिक झाली. इतकी मोठी जट सांभाळणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे डोकीवर बांधली जात होती. गेल्या 50 वर्षांपासून जटांचा भार ते सांभाळत होते. 

दरम्यान, शामराव सुतार यांच्या मनात अकारण निर्माण झालेले भीती अंनिसचे कार्यकर्ते डॉ. सुदाम हरेर यांनी प्रबोधनातून दूर केली. त्यानंतर ते जटानिर्मूलनाला तयार झाले. डॉ. हरेर, प्रा. पी. डी. पाटील यांनी जटानिर्मूलन केले. अंनिसच्या गडहिंग्लज शाखेचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष कोरे, शिवराज पाटील, भास्कर सुतार, सविता सुतार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

आतापर्यंत 35 जणांचे जटानिर्मूलन 
गडहिंग्लज तालुक्‍यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून जटानिर्मूलन चळवळीने जोर धरला आहे. आतापर्यंत 35 जणांचे जटानिर्मूलन झाले आहे. तर गेल्या वर्षभरात नेसरी शाखेने 13 व गडहिंग्लज शाखेने 7 जणांचे जटानिर्मूलन केले आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चळवळीला ब्रेक लागला होता. सुतार यांच्या जटानिर्मूलनाने हा ब्रेक निघाला आहे.

संपादन - सचिन चराटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com