esakal | जोतिबा डोंगरावर केवळ शांतता ; गुलालाच्या उधळणीविनाच पहिला खेटा 

बोलून बातमी शोधा

jotiba tempal festival closed kolhapur marathi news sunday update}

आज पहिला खेटा असल्याने डोंगरावर गर्दी होऊ नये म्हणून पोलिस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने काल सायंकाळी डोंगरावर येणारे सर्व रस्ते बंद  करुन नाका बंदी केली .

जोतिबा डोंगरावर केवळ शांतता ; गुलालाच्या उधळणीविनाच पहिला खेटा 
sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश गुजरात या राज्यातील लाखो भाविकांचे  श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर आज  भाविकांविना  खेटयांना प्रारंभ झाला. डोंगरावर आज चांगभलचा जयघोष ऐकायला मिळाला नाही. गुलालाची उधळण किंवा गुलालात माखलेले भाविक दिसले नाहीत . डोंगर केवळ शांतता अनुभवास मिळाली . कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे डोंगरावर येण्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई व देवस्थान व्यवस्थान समितीने  पाच होणाऱ्या खेटयांना बंदी घातली असून दर्शनासाठी मंदिर ही बंद ठेवण्यात आले आहे.
   

आज पहिला खेटा असल्याने डोंगरावर गर्दी होऊ नये म्हणून पोलिस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने काल सायंकाळी डोंगरावर येणारे सर्व रस्ते बंद  करुन नाका बंदी केली . तरी सुद्धा आज पहाटे पासून जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी हजारो भाविकांनी हजेरी लावली व तेथूनच नमस्कार करून परतीची वाट धरली.
 आज खेट्यासाठी गिरोली यमाई रस्त्यावर सांगली सातारा कराड या भागातील अनेक भाविक आले पण तेथूनच  त्यांना पोलिसांनी परत पाठवले .  दरम्यान, उद्यापासून( सोमवार ते शनिवार ) मात्र सकाळी सात ते रात्री आठ पर्यंत भाविकांन साठी मंदिर खुले राहणार आहे. त्यासाठी सर्वांनी सोशल ड्रिस्ट्रन्स पाळणे बंधनकारक आहे. भाविकांना मास्क तसेच सॅनेटायझर लावून मंदिरात सोडण्यात येणार आहे .आज सर्व ग्रामस्थ , पुजारी भाविक  यांनी शासकीय यंत्रणेस मोलाचे सहकार्य केले . त्यामुळे पहिल्या खेट्याचा बंद यशस्वी झाला .

हेही वाचा- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लालपरीला ठरतोय घातक ; प्रवासी संख्येत घट -

कोडोली पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद हे कालपासून दिवस रात्र डोंगरावर बंदोबस्त व नियोजनासाठी राबत होते. त्यांनी आज दुपारी डोंगर सोडला . त्यांना जोतीबा वर असणारे पोलीस कर्मचारी एम एल पाटील, मनोज कदम यांनी साथ दिली. त्यामुळे आज नियोजन व्यवस्थित झाले. 

संपादन- अर्चना बनगे