फिल्मफेअरमध्ये कलापूरची हॅटट्रिक 

Kalapur's hat-trick in Filmfare
Kalapur's hat-trick in Filmfare

कोल्हापूर : येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ प्रस्तुत "देशी' या लघुपटाला यंदाचा प्रेक्षक पसंतीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. काल रात्री जुहू येथे रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात अभिनेत्री सोनम कपूरच्या हस्ते निर्माते राजेंद्रकुमार मोरे, दिग्दर्शक रोहित कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

दरम्यान, सलग तिसऱ्या वर्षी कलापूरच्या शॉर्टफिल्म मेकर्सनी या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. 2018 ला उमेश बगाडेच्या "अनाहुत' लघुपटाला तर गेल्या वर्षी सतीश सूर्यवंशी यांच्या "द सॉकर सिटी' या लघुपटाला या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. 

"देशी' या लघुपटात वीणा जामकर यांच्यासह गार्गी नाईक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुधीर जोशी, स्वरा कुरणे, ईशान महालकरी, उमेश नेरकर, एन. डी. चौगले, अनुजा बकरे, मोहिनी बोंद्रे आदींच्या भूमिका आहेत. वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या मुलीला शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या अडचणींच्या विषयावर हा लघुपट बेतला असला तरी तो समाजातील धर्म आणि जाती-पातींतील विषमतेवर भाष्य करतो. या लघुपटासाठी जयदीप निगवेकरने छायांकन, डॉ. जयभीम शिंदे यांनी संगीत दिले आहे तर शेखर गुरवचे संकलन आहे. 

दरम्यान, पुरस्कार वितरण सोहळ्यात फिल्मफेअर समितीचे सदस्य, दिग्दर्शक करण जोहर, रेमो फर्नांडिस, आर. माधवन, अभिनेत्री करिना कपूर, विद्या बालन आदी उपस्थित होते. नेहा धुपियाने सूत्रसंचालन केले. 

बरीच वर्षे या विषयावर लघुपट तयार करण्याची इच्छा होती. ही इच्छा पूर्ण झालीच. पण, त्याही पेक्षा आता या लघुपटाच्या निमित्ताने कलापूरसाठी आणखी एक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, याचा आनंद मोठा आहे. 
- रोहित कांबळे, दिग्दर्शक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com