कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती  एस. एल. धर्मेगौडा यांनी रेल्वे ट्रॅकवर केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 December 2020

धर्मेगौडा हे गेल्या काही दिवसांत बातम्यांमध्ये झळकले होते.

बंगळुरू : कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती जनता दल धर्ननिरपेक्ष पक्षाचे आमदार एस. एल. धर्मेगौडा यांनी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केल्याने कर्नाटकातील राजकारणात खळबळ उडाली आहे. चिंकमंगळूर जवळील एका गावातील रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह रात्री दोन वाजता आढळला. ते ६४ वर्षांचे होते.गोरक्षा कायदा संमत करताना विधानपरिषद मध्ये जो गोंधळ झाला होता, त्यावेळी काँग्रेस आमदारांनी याच धर्मे गौडा यांना खुर्चीवरून उचलून सभागृहाबाहेर  हाकलले होते.

धर्मेगौडा हे गेल्या काही दिवसांत बातम्यांमध्ये झळकले होते. काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना सभापतीपदाच्या खुर्चीवरुन खेचल्याचा प्रकार सभागृहात घडला होता. काँग्रेस असलेले विधानपरिषदेचे सभापती प्रतापचंद्र शेट्टी यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी भाजप आणि जनता दल यांनी हातमिळवणी केली होती. त्यामुळे धर्मेगौडा यांना सभापती पदाच्या खुर्चीवर बसू न देण्यासाठी काँग्रेस आमदारांनी प्रयत्न केले होते. यावरुन काँग्रेसच्या आमदारांना निलंबित करण्याची मागणी भाजपने केली होती. 

हेही वाचा- शिवाजी पेठेत राष्ट्रवादीची नवी खेळी -

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka Legislative Council Deputy Speaker S. L. Dharmegauda commits suicide on railway tracks