कुटुंबाला धक्का: ऐन दिवाळीत दरवाजाची कडी तोडून दोन लाखावर चोरट्यांनी मारला डल्ला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

कसबा वाळवेत घटना; व्यावसायिक कुटुंबाला धक्का

कसबा वाळवे (कोल्हापूर) : ऐन दिवाळीत दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून झालेल्या घरफोडीत दोन लाख पंधरा हजार रोकडवर चोरट्यांनी डल्ला मारला. गुरुवारी रात्री येथे ही घटना घडली. याबाबत संदीप फराक्‍टे यांनी राधानगरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी,

येथील पिराचीवाडी मार्गावरील महावितरणच्या शेजारी संदीप फराक्‍टे यांचा बंगला आहे. फराक्‍टे यांचे गावात किराणा मालाचे दुकान आहे. घरातील सर्व मंडळी दिवाळीमुळे दुकानाकडे गेली असता चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून दुकानात विक्री होऊन आलेली २ लाख १५ हजार रोकड पळविली.

हेही वाचा- बचत गटाच्या नावाखाली पैसे गोळा करत महिलांची फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला केले जेरबंद -

राधानगरी पोलिसांनी पंचनामा केला. ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. तज्ज्ञांनी कडी-कोयंडा दरवाजा व कपाटाचे ठसे घेतले आहेत. श्वानपथक इमारतीच्या परिसरातच घुटमळले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक उदय डुबल, पोलिस उपअधीक्षक अनिल कदम यांनी भेट दिली.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kasba Valve incident thief Stolen cash in radhanagari family