साडेचार लाखांसाठी  नातवाला ताब्यात ठेवून सुनेला  दिले घरातून हाकलून

Khamanewadi case Acts for four and a half lakhs spent on marriage
Khamanewadi case Acts for four and a half lakhs spent on marriage
Updated on

कळे (कोल्हापूर)  : लग्न व बाळंतपणात झालेल्या खर्चाची मागणी करून दागिने व नातवाला ताब्यात ठेवून सुनेला घरातून हाकलून दिल्याची घटना वेतवडेपैकी खामणेवाडी (ता. पन्हाळा) येथे घडली. या प्रकरणी ऐश्वर्या शरद दळवी (वय २३) यांनी पती शरद बाळू दळवी, सासू बेबीताई दळवी, सासरा बाळू बाबू दळवी (सर्व जण वेतवडेपैकी खामणेवाडी) यांच्यासह नणंद जया नितीन किरुळकर (रा. फुलेवाडी) व सुजाता उत्तम पाटील (पासार्डे, ता. करवीर) यांच्याविरोधात कळे पोलिसांत तक्रार दिली.

चार वर्षांपूर्वी पुनाळ येथील ऐश्वर्या यांचा विवाह शरद याच्याशी झाला होता. लग्नासाठी झालेला खर्च चार लाख व बाळंतपणातील शस्त्रक्रियेसाठी झालेला खर्च ५० हजार असे साडेचार लाख रुपये खर्च आजोबांकडून आणण्याचा तगादा वर्षभरापासून त्यांच्याकडे लावला होता, तसेच मानसिक व शारीरिक त्रास दिला. सोन्याचे दागिने व मुलगा युगंधर याला ताब्यात ठेवून घरातून हाकलून लावल्याची फिर्याद विवाहितेने दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल एस. व्ही. पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com