कोई भी रोड पे ना आए... ही तर आपल्या कोल्हापुरी भावाची कन्सेप्ट....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कलापूरची कन्सेप्ट : पंतप्रधानांनी केले राष्ट्राला आवाहन

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्राला उद्देशून आवाहन करताना 'कोई रोड पर ना निकले' अशा आशयाचा छोटा फलक दाखवला. संबंधित डिझाईन सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याचेही त्यांनी सांगितले. हे डिझाईन येथील युवा आर्टिस्ट विकास डिगे याने केले असून गेली आठवडाभर ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

येथील लक्ष्मीपुरी परिसरात विकासची ऍड टुमारो ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपतांना त्याने आवाहनपर विविध डिझाइन्स करून सोशल मीडियावर शेअर केली. रविवारी झालेल्या जनता कर्फ्यूमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, यासाठी त्याने संबंधित डिझाईन तयार केले. त्यानंतर हे डिझाईन इतरांनाही व्हायरल केलेच त्याशिवाय अनेकांच्या 'स्टेटस', 'डीपी' वरूनही ते झळकले आणि बघता बघता देशभरात पोचले, असे विकास सांगतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: koi rod pe na aaye its concept of kolhapuri young artist