मोठी बातमी : कोल्हापूरात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ

in kolhapur 24 hours 955 new corona positive patients found and infected 32 died
in kolhapur 24 hours 955 new corona positive patients found and infected 32 died

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. गेल्या २४ तासांत रविवारी ( ६) रात्री १२ ते सोमवारी ( ७) रात्री १२ पर्यंत ९५५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर ३२ बाधितांचा मृत्यू झाला. दिवसात ९५५ बाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक झाल्याचे स्पष्ट होत आहे. 


दरम्यान, काल  दिवसभरात ४२५ कोरोना बाधित ठणठणीत बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात कोरोना बाधितांची आज अखेर संख्या ३० हजार ८६ वर पोचली आहे. तर १८ हजार ८७६ कोरोनामुक्त झाले आहेत.


जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हावी, वाढत्या संसर्गाला आळा बसावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गाव आणि प्रभाग पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे नियोजन केले जात आहे. त्यासाठी समित्यांच्या नियुक्‍त्या केल्या जात आहेत. त्या माध्यमातून कोरोनाची प्राथमिक लक्षणे असणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. मात्र, दररोज कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे सर्वच यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र आहे. 


जिल्ह्यात रविवारी रात्री १२ आणि सोमवारी रात्री १२ पर्यंत ९५५ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. अनेकांना वेळेत उपचार मिळालेले नाहीत किंवा काही रुग्ण अत्यवस्थ असतानाच रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा आवश्‍यक उपचार होत नसल्याचे दिसून येत आहेत. कोरोनाबाधितांवर वेळेत औषधोपचारासाठी रुग्णांचे नातेवाईक प्रत्येक दवाखान्यात जाऊन चौकशी करत आहेत.

आज अखेर तालुका व नगरपालिका परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या :
करवीर- ३१८१. आजरा - ५०२. भुदरगड ६५८. चंदगड ६५३. गडहिंग्लज ६६५. गगनबावडा ७८. हातकणंगले ३४१४. कागल ९४३. पन्हाळा १०४५. राधानगरी ७८४. शाहूवाडी ६३७. शिरोळ १६२४. कोल्हापूर महानगरपालिका परिसर ९३०० रुग्ण. नगरपालिकेंतर्गत इचलकरंजी ३१७६. जयसिंगपूर ५१७. कुरुंदवाड ११४. गडहिंग्लज ३२. कागल ३२७. शिरोळ १८५. हुपरी ४१६. पेठवडगाव १८४. मलकापूर १२. मुरगूड ४९, असे एकूण नगरपालिका क्षेत्रात ५ हजार ११ रुग्ण. इतर जिल्ह्यातून कोल्हापूरमध्ये आलेले ८६८ रुग्ण.

जिल्ह्यातील स्थिती :
  सध्या उपचार घेणारे    १० हजार ३१५ 
  एकूण कोरोनामुक्त    १८ हजार ८७६ 
  आजअखेर एकूण मृत्यू    ८९५
  एकूण कोरोनाबाधित     ३० हजार ८६

संपादन - अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com