शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अश्या पध्दतीने होणार ऑक्‍टोबरपासून

shivaji university final year examination will be conducted online and offline start From 1st October
shivaji university final year examination will be conducted online and offline start From 1st October

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. प्रश्‍नपत्रिका ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची (ऑप्शनल) असेल. ५० मार्कांची परीक्षा असून प्रात्यक्षिक झालेल्या विषयांना प्रश्‍नपत्रिका ४० गुणांची असणार आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही ठिकाणी प्रश्‍नपत्रिका एकच असणार असून एक तासाचा अवधी असणार आहे. १ ऑक्‍टोबरपासून लेखी  परीक्षेस प्रारंभ होणार असून, सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ३१ ऑक्‍टोबरपर्यंत निकाल लावण्याचे आव्हान विद्यापीठ प्रशासनासमोर आहे.
     
 बॅकलॉग असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालयावरच होणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापरिषदेची बैठक काल ऑनलाईन पद्धतीने झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. रविवारी ( ६) अधिष्ठाता मंडळ, अधिकार मंडळ आणि परीक्षा विभागाची बैठक झाली होती. यामध्ये परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यावर एकमत झाले. मात्र, या परीक्षा कधी आणि कशा प्रकारे घ्यायच्या, याबाबतचा अंतिम निर्णय विद्या परिषदेच्या बैठकीत होणार होता. त्याप्रमाणे काल विद्या परिषदेच्या बैठकीत हा निर्णय झाला. अंतिम वर्षांच्या परीक्षा या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. ही परीक्षा ५० गुणांची असणार असून, सर्व प्रश्‍न वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी असणार आहेत.

ज्या विषयांची प्रात्यक्षिक झाली आहे, त्यांची ४० गुणांची परीक्षा होईल. १० गुण प्रात्यक्षिक परीक्षेचे असतील. ज्यांचे प्रात्यक्षिक झाले नाही, त्यांची मात्र ५० गुणांची परीक्षा होणार आहे. ऑफलाईन परीक्षांचाही पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आला असून यासाठी महाविद्यालये, शाळा तात्पुरत्या घेऊन तेथे परीक्षा होईल. परीक्षांचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. ३१ ऑक्‍टोबरपर्यंत परीक्षा होऊन निकाल लावण्याचे आदेश यूजीसीकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार वेळापत्रक ठरवण्यात येणार आहे. १० नोव्हेंबरपर्यंत परीक्षांसाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विद्यापीठ प्रशासनाकडून यूजीसीला करण्यात येणार आहे. 


काल झालेल्या बैठकीला प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक डॉ. गजानन पळसे, विद्यापरिषदेचे ४० सदस्य, अधिष्ठाता यांच्यासह प्रशासकीय सदस्य ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. 


अंतिम वर्षांचे एकूण विद्यार्थी - ७५,०००
महाविद्यालये - २९३
बॅकलॉगचे विद्यार्थी - २५,०००
विषयनिहाय प्रश्‍नपत्रिका - १६०० 
विषय - ४७५

सॉफ्टवेअरचा प्रश्‍न 
विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रश्‍नपत्रिका देणे, त्या तपासणे आणि त्याचे थेट गुण संबंधित शिक्षकांना देणे, ही सर्व कामे करणारे सॉफ्टवेअर असते. यामुळे प्रश्‍नपत्रिका तपासण्याचा वेळ वाचतो. मात्र, सध्या हे सॉफ्टवेअर शिवाजी विद्यापीठ, तसेच पुणे विद्यापीठाकडे नाही. त्यामुळे हे सॉफ्टवेअर कसे मिळवायचे. ते शासन देणार की विद्यापीठाने घ्यायचे, याबाबत चर्चा सुरू आहे.

संपादन - अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com