दुख:द..! कोल्हापूरच्या रायडिंगच्या 'गौरव'ची चटका लावणारी एक्झिट

kolhapur bike rider gaurav patil pass away
kolhapur bike rider gaurav patil pass away

कोल्हापूर : हरहुन्नरी रायडर, ज्याने कोल्हापूरच्या बाइकिंगचा दबदबा निर्माण केला. अनेक कीर्तिमान बनवले आणि ते स्वतःच तोडत पुन्हा नवे कीर्तिमान स्थापित केले. अश्‍या या 'गौरव'शाली रायडरने आयुष्यातून एक्‍सिट घेतली. गौरव पाटील असे या रायडरचे नाव. बायकर्स ऑफ इंडिया या ग्रुपचा सदस्य असणारा गौरव नव्याने बाइकिंगमध्ये येणाऱ्यांचे प्रेरणा स्थान होता. 

कोल्हापूरचा एक दिलदार मोटारसायकल रायडर आणि रेसर. कोल्हापूरमध्ये रेसिंगला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या सुरवातीच्या काही मोजक्‍या जणांपैकी एक. दम गाडीत नाही तर ती चालवणाऱ्याच्यात असतो हेच त्याने प्रत्येक नवख्या रायडरला शिकवले. सुरवातीच्या रेसिंगच्या काळात अगदी यामाहा वरून अनेक शर्यती जिंकणाऱ्या या रेसरने बुलेट देखील लीलया हाताळली. उंच्यापुऱ्या आणि भक्कम शरीरयष्टी असणाऱ्या या रायडरने कोल्हापूरच्याच न्हवे तर देशभरातील मोटारसायकल रायडर्समध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. रेसिंगचे मैदान गाजवणारा हा रायडर मात्र आयुष्याच्या मैदानावर अल्पायुषी ठरला. काही दिवसांच्या आजाराने त्याची प्राणज्योत मालवली.   

गोवा येथे होणाऱ्या रायडर मेनिया स्पर्धेत सहभाग घेत अत्यंत अवघड अशी ही डर्ट ट्रॅक शर्यत त्यानं सहजच जिंकली. स्पर्धेमधल्या सर्व विजेत्यांची असणारी चॅम्पियन ऑफ चॅम्पिअन्स शर्यतही सहज खिशात टाकली. या नंतर त्यानं मागे वळून पाहिले नाही. स्वतः:उत्तम रेसर असतानाच कोल्हापूरच्या इतर रेसर्सना सुद्धा मार्गदर्शन आणि उत्साह देत राहिला. गौरवने आपल्या 16 वर्षाच्या मुलीला देखील रेसर म्हणून पुढे आणले आणि पहिल्याच प्रयत्नात तिने देखील मोटोक्रॉस, रॉयल रोडिओ आणि रायडर मेनियाया सारख्या अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले.

गौरवने जगातल्या सर्वोत्तम एन्ड्युरन्स रायडर्ससाठी असणाऱ्या सॅडल सोअर (24 तासात 1600 किमी), बनबर्नर (36 तासात 2400 किमी) आणि बनबर्नर 3000 (42 तासात 3000 किमी) ह्या राईड पहिल्या प्रयत्नात आणि एकाच वेळी पूर्ण केल्या. मात्र यंदाच्या वर्षीचे 'सुवर्ण चतुष्कोण' ही राईड विक्रमी वेळेत करायचं स्वप्न मात्र अधुर राहिलं. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com