जगात भारी कोल्हापूरी ; एकटाकी भिंतीवर चित्र काढणारा कोल्हापूरचा अवलिया

अमोल सावंत  
गुरुवार, 16 जुलै 2020

तेजसने बंगल्यात अनेक खोल्यांत भिंतीवर अशी चित्रे काढली आहेत. 

रमण मळा (कोल्हापूर) : कागदावर चित्र काढणे सोपे, चित्र व्यवस्थित झाले नाही तरी ते खोडता येते. मात्र, भिंतीवर चित्र काढताना ते खोडता येत नाही. चित्र न खोडता, वेडेवाकडे न करता ते एकटाकी भिंतीवर काढणे ही कला आहे. ही कला तेजस विजय सावंत याने साध्य केली. तेजसने बंगल्यात अनेक खोल्यांत भिंतीवर अशी चित्रे काढली आहेत. 

करवीर पंचायत समितीच्या मागील बाजूस सीता कॉलनीत तेजसच्या ‘जयश्री’ बंगल्यात स्वत:चा स्टुडिओ आहे. न्यू कॉलेजमधून आर्किटेक्‍चर पूर्ण केले; पण लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. तेजसने अशी चित्रे कागदावर रेखाटली. तो म्हणतो, ‘‘कागदावर चित्र काढणे अवघड नाही; पण भिंतीवर चित्र काढून पूर्ण करणे कठीण आहे.’’ आर्किटेक्‍चर शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रपटनिर्मिती कशी केली जाते? कोणत्या तंत्राने चित्रपट पूर्ण होतो, इकडे लक्ष गेले. सिनेमॅटॉग्रॉफी कोर्स करायचे ठरविले. अमेरिकेतील न्यू यॉर्क फिल्म ॲकॅडमीत तेजसला ॲडमिशन मिळाले. मात्र, कोरोनाच्या प्रभावामुळे अमेरिकेला तो जाऊ शकला नाही. तत्पूर्वी, मुंबई फिल्म ॲकॅडमीत प्रोफेशनल प्रॅक्‍टिस अन्‌ इंटर्नशिपसाठी सुरू केली. आतापर्यंत सहा ते सात शॉर्टफिल्मस्‌ तयार केल्या आहेत. 

तो म्हणतो, ‘‘सिनेमॅटोग्राफी म्हणजे, एखादे पिक्‍चरचे सीन्स्‌ डिझाईन करावे लागतात. तेही कॅमेरा आणि लाइट्‌सच्या माध्यमातून. यासाठी ॲरी ॲलेक्‍स, रेड ड्रॅगन कॅमेरे वापरले जातात. मीही सर्व तंत्रे शिकलो. लॉकडाउनमुळे मुंबईत जाता आले नाही. यासाठी मी फिल्म एडिटिंग, ॲनिमेशन (व्हीएफएक्‍स) तंत्रावर काम सुरू आहे. मी फायनल कट हे सॉफ्टवेअर शिकलो. यासाठी आजी-आजोबा, आई-वडिलांनी सॉफ्टवेअर्स, कॅमेरा, लॅपटॉप घेऊन दिला.’’ हे करताना तेजस २०१५ मध्ये भिंतीवर चित्रे काढण्याची प्रॅक्‍टिस करू लागला.

तो म्हणतो, ‘‘भिंतीवर चित्र काढताना पोस्टल, फॅब्रिक कलरचा वापर केला जातो. हे रंग खराब होत नाहीत. मी पहिल्यांदा रोनाल्डोचे चित्र काढले. मग जॉनी डिप, आयर्न मॅन (टोनी स्टार) रेखाटला. पोट्रेट करण्यावर लक्ष केंद्रित केले. यानंतर मी ग्रॅन्ड स्केलवर मार्व्हलची ॲव्हेंजर सीरिज भिंतीवर चित्रीत केली. ही सीरिज चार मीटर बाय साडेतीन मीटर अशी आहे. यात हीरो, व्हिलन अशी ३४ पात्रे आहेत.’’ 

हे पण वाचा -  Video - बंबात जाळ अन्‌ कोल्हापूरचा विषयच हार्ड; या भावाच्या व्हिडिओने लावलंय सगळ्यांनाच याड

 

करिअर सिनेमॅटोग्राफीतच
पुढील करिअर सिनेमॅटोग्राफीतच करायचे आहे, असे ते म्हणतो. आतापर्यंत मित्रांच्या घरी, कॉलेजमध्ये तेजसने भिंतीवर चित्रे काढली आहेत. गणेशोत्सवात मूर्तीच्या मागील डेकोरेशन, थ्रीडी लाइट्‌स अशी माध्यमे वापरून तो चित्रे काढतो. जेव्हा घरात मार्व्हल सिरीज पूर्ण झाली, तेव्हा अनेक जण पाहण्यासाठी ते येत होते.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur boy created Cinematography