कोविशिल्ड लस घेतली अन् हृदय शस्त्रक्रिया यशस्वी केली 

kolhapur corona vaccine cpr dr akshay bafana
kolhapur corona vaccine cpr dr akshay bafana

कोल्हापूर - कोरोना पतिबंधक लस दिर्घ संशोधनानंतर प्रथमच आली, अशी लस घेतल्यास आपल्याला काही रिऍक्‍शन यूे शकेल काय ? एवढीच शंका घेऊन अनेकजण लसीकरणापासून दूर होते. मात्र सीपीआर रूग्णालयांच्या हृदयशस्त्रक्रिया विभागाचे हृदयरोग तज्ञ डॉ. अक्षय बाफना यांनी पहिल्यांदा लस घेतली. त्यानंतर एक तास विश्रांती घेवून  त्यांनी आपल्या विभागात जाऊन 61 वर्षीय वृध्द व्यक्तीची हृदय शस्त्रक्रिया(अॅन्जीओ प्लास्टी) यशस्वी करीत वृध्दाला जीवदान दिले. कोविशिल्ड लसीकरणनंतरही आपण तंदुरूस्त असल्याचा दावा प्रात्यक्षिकासह त्यांनी सादर केला. देशातील किंवा राज्यातील पहिलीच घटना असल्याचे वैद्यकीय वर्तुळात बोलले जात आहे.
 
राज्यभरात कोविशिल्ड लसीकरणाला सुरवात झाली. त्यानुसार सीपीआर रूग्णालयात कोविशिल्डचे लसीकरण झाले. कोरोनायोध्दा म्हणून काम केलेल्या डॉक्‍टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनीही लस देण्यात येत होती. गेल्या नऊ महिन्यात सीपीआरमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांवर उपचार झाले. त्यात बहुतेक रूग्णांचे हृदयविकाराची लक्षणे तपासणी व उपचार सेवेत आघाडीवर असलेले डॉ. अक्षय बाफना यांनाही कोविशिल्डचे लसीकरण करण्यात आले. 

लसीकरणानंतर डॉ. बाफना यांची प्रकृतीबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, डॉ. उल्हास मिसाळ , डॉ. महेंद्र बनसोडे आदीनी विचारपूस केली. डॉ. बाफना परवानागी घेऊन हृदयशस्त्रक्रिया विभागात गेले. तेथे त्यांनी हृदयरूग्णांची तपासणी केली. 

61 वर्षाच्या पुरूषाला हृदयविकाराची गंबीर लक्षणे होती त्या रूग्णांची तपासणी केली असता रूग्णाच्या हृदयाला डाव्या बाजूला असलेल्या शिरेत ब्लॉकेज असल्याचे आढळले. अशा गुंतागुंतीच्या अवस्थेत हृदयशस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने डॉ. बाफना यांनी डॉ. वरुण देवकाते यांच्या सहयोगाने विनाछेद शस्त्रक्रिया यशस्वी केली. 

लस घेणे टाळले नाही. 
नव्याने आलेली कोविशिल्ड लसी बाबत अनेक कुशंका कुशंका घेऊन अनेकांनी लसीकरणासाठी नाव नोंदणी करूनही लस घेणे टाळले पण या लस तयारी करणाऱ्या संशोधक व आपल्या सोबत असलेल्या आरोग्य यंत्रणेच्या डॉक्‍टरांवर विश्‍वास ठेवून डॉ. बाफना यांनी सीपीआर रूग्णालयात पहिल्यांदा कोविशिल्ड लस घेतली. त्यानंतर एक तास विश्रांती घेतली पुढे चार सहकाऱ्यां समावेत हृदय रूग्णांची हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी केली. 

कोविशिल्ड लसीकरणाबाबत डॉ. बाफना म्हणाले की, "" मी माझा बंधू डॉ. वरून बाफना यांच्यासह अन्य डॉक्‍टरांशी बोलून लस सुरक्षीत असल्याचे समजून घेतले. आई - वडील व पत्नीला मी लस घेणार असल्याचे सांगितले. तसेच शासकीय महाविद्यालयाच्या डॉक्‍टारांनी तसेच आरोग्य विभागाच्या डॉक्‍टरांनी लसीकरणानाला प्रोत्साहन दिले मी लस घेतली मला कोणताही त्रास झाला नाही. मी पूर्ण क्षमतेने नेहमी सारख्याही हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया करू शकलो.'' 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com