Kolhapur CPR Fire Update : मेन स्विच बंद केला नसता तर... 

संदीप खांडेकर 
Monday, 28 September 2020

पहाटे सर्व जण गाढ झोपेत असताना सेंटरला आग लागली. झोपेतून उठलेल्या केसरकर यांची नजर सेंटरकडे गेल्यावर आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

कोल्हापूर - सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरला आज पहाटे आग लागली. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या पंधरा कोरोना रुग्णांना तत्परतेने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. मात्र, त्यानंतर व्हेंटिलेटर जोडेपर्यंत दोघांचा तर त्यानंतर अन्य दोघे, असा एकूण चौघांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या दुर्घटनेवेळी सतर्कता दाखवून मेन स्वीच बंद केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही सतर्कता दाखविली बळीराम केसरकर यांनी. केसरकर यांच्या सतर्कतेचे सध्या कौतुक होत आहे. 

याबाबत अधिक माहित अशी, आज पहाटे सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरला आग लागली. यावेळी मेन स्विच ऑफ करण्याचे प्रसंगावधान बळीराम केसरकर यांनी दाखवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि देवदूतासारखे धावलेल्या केसरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. 

पहाटे सर्व जण गाढ झोपेत असताना सेंटरला आग लागली. झोपेतून उठलेल्या केसरकर यांची नजर सेंटरकडे गेल्यावर आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ओरडतच मेन स्विचकडे धाव घेतली आणि स्विच ऑफ केला. त्यांच्या ओरडण्याने अन्य कर्मचारीही खडबडले. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, डॉक्‍टर्स, नर्सेस यांनी तत्काळ रूग्णांना सेंटरमधून हलविण्यास सुरवात केली. सहा ते सात रूग्णांना त्यांनी दुसऱ्या विभागात नेले. अग्निशमन दलाच्या जवानांनी उर्वरित रूग्णांना हलविले व परिस्थिती नियंत्रणात आणली.

हे पण वाचा -  तो दिवस दोघी मैत्रीणींसाठी ठरला शेवटचा ; घटनास्थळावरील दृश्य मन हेलविणारे 

केसरकर यांनी तत्काळ स्विच बंद केल्याने पुढील अनर्थ टळल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. ते मुंबईतील बॅंक ऑफ बडोदामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. मात्र, त्यांच्या कामाचा अनुभव आज सीपीआर प्रशासनाला आला. 

हे पण वाचा - ''छत्रपती घराणे आमची अस्मिता ; खासदार संभाजीराजेंना दुखावण्याचा हेतू नव्हता''

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur CPR Fire Update Baliram Kesarkar switched off the main