
दोघा जखमींना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले
कोल्हापूर - दोन गटात सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या भावांना जमावाने बेदम मारहाण केली. न्यू महाद्वार रोड परिसरात सायंकाळी हा प्रकार घडला. दोघा जखमींना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती, न्यू महाद्वारोड परिसरात कुटुंब राहते. कुटुंबातील दोन्ही मुले "एसी' बसविण्याचे काम करतात. गांधीनगर येथील काम आटोपून दोघे सायंकाळी घरी आले. त्या वेळी त्यांच्या घरासमोर गोंधळ सुरू झाला. नेमके काय झाले हे पाहण्यासाठी दोघे बाहेर आले. त्या वेळी 15 ते 20 जण दोघांना मारहाण करीत होते. त्यांची जमावाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी मोठा भाऊ पुढे गेला; पण जमावाने त्यालाच मारहाण करण्यास सुरवात केली. त्यात एकाने फरशीने केलेल्या मारहाणीत तो जखमी झाला. हे पाहून लहान भाऊही मदतीला धावला. तसा जमावाने दोघा भावांना मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी झालेल्या ओरड्याने परिसरातील नागरिक जमा झाले. तसा जमाव पसार झाला. दरम्यान रिक्षा चालकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आली. जखमी भावांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.
संपादन - धनाजी सुर्वे