मोठी बातमी : कोल्हापूर पाचशे पार...आणखी २१ जण पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

या २१ जणांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता ५०४ वर पोहोचली आहे. 

कोल्हापूर - नाही म्हणता म्हणता जिल्ह्याने कोरोना रूग्णांचा पाचशेचा अकडा पार केलाच. आज दिवसभरात तब्बल ६८ जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. ही संख्या तापर्यंत सर्वात जास्त आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार आणखी २१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या २१ जणांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता ५०४ वर पोहोचली आहे. 

आता अहवालापैकी आकरा जण कागल, गडहिंग्लजमधील तीन, शाहुवाडीतील पाच आणि राधानगरीतील दोघांचा समावेश आहे. आज साकळी पहिल्यांदा तीस, नंतर १७ आणि आता २१ जणांचे अवहावाल पाॅझिटिव्ह आहे आहेत. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राधानगरी तालुक्‍याचे अर्धशतक 
राधानगरी तालुक्‍यात आज आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तालुक्‍यातील एकूण बाधित संख्या 57 झाली आहे. अर्धशतक आज ओलांडले आहे. 
जिल्ह्याबाहेरून आलेले सर्व रुग्ण असून, यांच्यावर राधानगरी कोविड सेंटर व सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. कालअखेर 49 रुग्ण बाधित आढळले होते. चार दिवसांत ही संख्या जवळजवळ थांबली होती. त्यानंतर आज अचानक आठने वाढ झाली आहे. काल मध्यरात्री आलेल्या अहवालानुसार फेजीवडे पैकी कासारवाडी येथील तीन रुग्ण बाधित आढळले. आज दुपारी आटेगाव, आमजाई व्हरवडे, मांढरेवाडी, कंदलगाव व मोघर्डे येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल येथील सेंटरमध्ये आले आहेत. 

हे पण वाचा - त्या चिमुरडीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली पण...

 

अलगीकरणातील तरुण पॉझिटिव्ह 

धामोड : चौके पैकी मांडवकरवाडी (ता. राधानगरी) येथे मुंबईवरून आलेला व संस्थात्मक अलगीकरणात ठेवलेल्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परिसरात रुग्ण संख्या आठ झाली आहे. हा तरुण मुंबई येथून पंधरा दिवसांपूर्वी मांडवकरवाडी गावी येऊन संस्थात्मक अलगीकरण केंद्रात कुटुंबासह राहत होता. तरुणाबरोबर असलेल्या महिला व दोन पुरुषाचे स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना कोल्हापूर येथे हलविले होते. परिणामी, आरोग्य विभागाने खबरदारी घेत त्यांच्यसोबतच्या इतर अलगीकरण व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पुन्हा घेतले. त्यामध्ये तरुणाच्या स्वॅबचा समावेश होता. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या तरुणाला प्राथमिक शाळेतून उपचारासाठी कोल्हापूरला हलविले आहे. सध्या चौके परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढून आठ झाली आहे.  

हे पण वाचा - धक्कादायक ; आरोग्य सेविकेचा पतीकडून गळा आवळून खून
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur cross to 500 in corona positive case