कोल्हापुरची विमानसेवा होणार सोमवार पासून सुरू...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

हैदराबाद - तिरुपती - बंगलोर अशा तीन ठिकाणी ही विमानसेवा सुरू होणार आहे.

कोल्हापूर - लॉक डाऊन नंतर 22 मार्चपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा सोमवार ता.25 पासून सुरू होत आहे. यासाठी ऑनलाइन बुकिंग सेवा सुरू झाली आहे.
हैदराबाद - तिरुपती - बंगलोर अशा तीन ठिकाणी ही विमानसेवा सुरू होणार आहे. यासाठी इंडिगो आणि आलायन्स एअर विमान कंपन्यांकडून ही विमानसेवा सुरू होणार असल्याचे कोल्हापूर विमानतळाची संचालक कमल कुमार कटारिया यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
एक जून पासून विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन होते डीजीसीए कडून 25 मे पासूनच विमानसेवा सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन सोशल डिस्टन्स सह आणि उपाययोजना करण्याबाबतची बैठक ही कटारिया यांनी घेतली आहे.

‌पूर्वीच्याच नियोजनाप्रमाणे कोल्हापूर येथून विमानसेवा सुरू राहील, दुपारी साडेअकरा वाजता तिरुपतीकडे जाणारे विमान लँडिंग होईल, तसेच पुन्हा दुपारी दोन वाजता तिरुपतीहून कोल्हापुरात दाखल होईल,
‌ कमल कुमार कटारिया - संचालक कोल्हापूर विमानतळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur flights will start from Monday