कोल्हापूरकरांची कोरोनाने चिंता वाढविली ; पालकमंत्री साधणार उद्या लोकप्रतिनिधींशी संवाद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जुलै 2020

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधितांबरोबरच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभुमीवर पालकमंत्री सतेज पाटील हे उद्या (ता. 17) सकाळी 10 वाजता कोरोनाच्या अनुषंगाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे बैठक घेणार आहेत. 

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधितांबरोबरच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. कोरोना बाधितांची संख्या एकीकडे वाढत असताना त्यांना ठेवण्यासाठी असलेले सीपीआर हॉस्पिटल फुल्ल झाले आहे. इचलकरंजीतील आयजीएम रूग्णालयही फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत आणखी रूग्ण वाढले तर काय उपाययोजना करता येतील याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. 

हे पण वाचा ब्रेकिंग - कोल्हापूरात  पुरवठा कार्यालयात खळबळ : अधिकारी पॉझीटीव्ह, तीन दिवस रहाणार कामकाज बंद 

जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या त्याचबरोबर मृत्यू त्या अनुषंगाने उपचार पध्दती, रूग्णालयांची व्यवस्था, आरोग्य साधनसामुग्रींचे नियोजन, प्लाझ्मा थेरेपी एकूणच जिल्ह्याची सद्यस्थिती याबाबत जिल्ह्यातील खासदार, आमदार या सर्वांची उद्या शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे संवाद साधून बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रमुखांनाही सहभागी होण्याची विनंती करण्यात येणार आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur Guardian Minister will hold a dialogue with the people representative tomorrow