
बांधिलकी आपुलकीची, विलगीकरणातील जिव्हाळ्याची अन् माणूसकीची...'अशी पाटी लावली आहे.
रुकडी (कोल्हापूर) : कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर परजिल्ह्यात गेलेले नागरीक मोठ्या संख्येने घरी परतत आहेत. अशा व्यक्तींना गावी परत आल्यानंतर गावाबाहेर विलगिकरण कक्षात 14 दिवस प्रतिकुल परिस्थितीत रहावे लागते. त्यांच्या घरच्यांनाही कोरोनाच्या भितीपोटी त्यांना दूर ठेवावे लागत आहे. यामुळे बाहेरून येणाऱ्यांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे दुरावा वाढत असून समाज व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामूळे खासदार धैर्यशील माने यांनी परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना विलगीकरणासाठी रुकडीतील त्यांचे स्वतःचे घर 'आपुलकी गृह' म्हणून दिले. यावेळी दरवाज्यावर त्यांनी 'बांधिलकी आपुलकीची, विलगीकरणातील जिव्हाळ्याची अन् माणूसकीची...'अशी पाटी लावली आहे.
कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, मुंबई, पुणे, सोलापूर, कराड अशा रेड झोनमधून नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त गेलेले सध्या गावाकडे येत आहेत. त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर निगेटीव्ह रिपोर्टस आलेनंतरही विलगीकरण कक्षात ठेवले जाते. मात्र बऱ्याच ठिकाणी विलगीकरण कक्षातील असुविधा व आरोग्यास अपायकारक वातावरणामुळे तेथे राहणे म्हणजे एखादा आजार ओढावून घेणेसारखे आहे. अशा परिस्थितीत शासनालाही मर्यादा पडत आहेत. या परिस्थितीवर मात करता येवू शकते हे खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या कृतीतून दाखवून संपूर्ण देशापुढे एक नवा आदर्श घालून दिला. त्यामूळे सर्व ठिकाणी अशा प्रकारे बाहेरून येणाऱ्यांसाठी त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह असेल तर समाजाने तसेच भावकीने पुढाकार घेऊन आपले घर मोकळे करुन द्यावे असे आवाहन खासदार माने यांनी यावेळी केले.
हे पण वाचा - तरुणी स्नान करत असतानाच त्याने भिंतीवर चढून केला हा प्रकार
कै.खासदार बाळासाहेब माने यांच्या कार्याच्या वारसाची चर्चा...
महापूरावेळी मदतीसाठी झटणारे खासदार धैर्यशील माने हे खऱ्या अर्थाने लोकनेते खासदार कै. बाळासाहेब माने यांच्या कार्याचे वारसदार बनले असून कोरोना सारख्या मोठ्या आपत्तीमध्येही जनतेसाठी कार्य करत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे त्यांनी जनता व प्रशासन यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. या लढाईत विजयी होण्यासाठी भावूबंदकीचे वाद बाजूला ठेवून आपल्याच माणसांसाठी आपलीच घरे उपलब्ध करुन देण्याचे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले आहे.
हे पण वाचा - बाप आहे की कसाई ; चौथीही मुलगीच झाल्याने उचलले हे धक्कादायक पाऊल