
विनाकारण हॉर्न वाजविण्याचे पेव; ध्वनी प्रदूषणासह नागरिकांना त्रास
कोल्हापूर : सिग्नलवर थांबल्यावर हिरवा दिवा लागायच्या अगोदरच कर्णकर्कश्श हॉर्नचे आवाज कानावर आदळतात. विनाकारण हॉर्न वाजवण्याची सवय अनेकांना जडली आहे. पूर्ण रस्ता काही सेकंदात मोकळा व्हावा, यासाठी हॉर्नवर हॉर्न वाजवण्याचा सपाटा सुरूच असतो. व्हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या आणि रस्त्यावरील इतर वाहन चालकांना अस्वस्थ करणाऱ्या प्रवृत्तीला लगाम लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
कार, ट्रक, खासगी बस अशा वाहनांकडून महामार्गावर म्युझिकल हॉर्न वाजवले जातात. महामार्गांवर या हॉर्नचा आवाज घुमतो. म्युझिकल हॉर्नला बंदी असूनही चालक हे हॉर्न बसवतात. कर्णकर्कश्श हॉर्नचे पेव शहरात फुटले आहे. शहरातही अनेकांनी मोठ्या आवाजाचे हॉर्न बसवून घेतले आहेत. वाहतूक नियमांनुसार हॉर्न कधी व कशासाठी वाजवावेत?, कुठे वाजवू नयेत, याची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत; पण या नियमांना फाट्यावर मारत चालक हॉर्न वाजवत असतात.
शहरातून हॉर्नचा आवाज करत वेगाने गाडी चावण्याची क्रेझ युवकांत आहे. एकमेकांना इर्षेने, खुन्नस देण्यासाठी हॉर्न वाजवण्याचे प्रकार घडतात. याचे रूपांतर नंतर वादात होते. हॉस्पिटल, कोर्ट, सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज या ठिकाणी ‘नो हॉर्न’ असा फलक असतो; परंतु या परिसरातही नियम मोडत हॉर्नचा आवाज केला जातो.
हेही वाचा- बबन शिंदे यांचा अंधश्रद्धेवर प्रहार; अख्खं कुटुंबच रंगते भजना
हॉर्न वाजवण्याचे संकेत...
पादचाऱ्याला सावध करण्यासाठी ओव्हर टेक करताना
प्रवाशाला वाटेत इशारा देण्यासाठी तीव्र वळणावर समोरील वाहनास इशाऱ्यासाठी
कर्णकर्कश हॉर्न वाजवण्याचे परिणाम...
ध्वनी प्रदूषणात भर कानांच्या पडद्याचा, तसेच रक्तादाबाचा त्रास
हॉर्न वाजवण्यावरून वादाचे प्रसंग होणे चालकाचे लक्ष विचलित होणे
संपादन- अर्चना बनगे